Union Budget
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Union Budget 2025 : काय स्वस्त, काय महाग? मोदी सरकारने बजेटमधून सर्वसामान्यांना काय दिलं?

Union Budget 2025 : काय स्वस्त, काय महाग? मोदी सरकारने बजेटमधून सर्वसामान्यांना काय दिलं?

Whats Gets Cheaper And Costlier: अर्थमंत्री म्हणून मंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अनेक गोष्टी स्वस्त करण्यात आल्याच्या घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:24 IST2025-02-01T12:23:09+5:302025-02-01T12:24:05+5:30

Whats Gets Cheaper And Costlier: अर्थमंत्री म्हणून मंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अनेक गोष्टी स्वस्त करण्यात आल्याच्या घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केल्या.

budget 2025 what is cheap what is expensive full list of cheaper and costlier item gold silver mobile cancer drugs became cheaper | Union Budget 2025 : काय स्वस्त, काय महाग? मोदी सरकारने बजेटमधून सर्वसामान्यांना काय दिलं?

Union Budget 2025 : काय स्वस्त, काय महाग? मोदी सरकारने बजेटमधून सर्वसामान्यांना काय दिलं?

Budget 2025 highlights : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) संसदेत सादर केला. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष कर ( इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली. त्यामुळे काही उत्पादनं स्वस्त होतील. तसंच नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. मुख्यत्वे कॅन्सर, ईव्ही या गोष्टींवरील कर कमी करण्यात आला आहे.

काय स्वस्त? काय महागणार?
चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार
इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील.
मोबाईल फोन आणि मोबाईलच्या बॅटरी स्वस्त होतील.
इलेक्ट्रिक कार स्वस्त होईल.
कपड्याच्या वस्तू स्वस्त होतील.
एलईडी टीव्हीही स्वस्त होईल.
कर्करोगावरील तब्बल ३६ औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहेत. 
तर अनेक औषधांवरून कस्टम ड्युटी हटवली जाईल.
फ्रोझन फिश पेस्टवरील कस्टम ड्युटी १५ वरून ५ 
विणकरांनी विणलेले कपडे स्वस्त होतील. 
सागरी उत्पादनांवरील कस्टम ड्युटी ३० वरून ५ टक्के करण्यात आली.

कोबाल्ट, लिथियम, आयन बॅटरी कचरा आणि जस्त वरील प्राथमिक आयात शुल्क काढून टाकण्यात आले आहे.
स्मार्टफोन आणि स्मार्ट एलईडी टीव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केली. यामुळे देशातील स्मार्ट एलईडी टीव्ही आणि स्मार्टफोनच्या एकूण किमती कमी होतील.
कॅरिअर ग्रेड इथरनेट स्विचेस स्वस्त होणार आहेत.
पुढील १० वर्षांसाठी जहाजे बांधण्यासाठी कच्च्या मालावरील मूलभूत सीमाशुल्कातून सूट.

काय महागलं?
फ्लॅट पॅनेल डिस्प्ले महाग होणार आहेत.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक्स किंवा स्मार्टफोन्स निर्मितीसाठी लागणारे घटक स्वस्त झाले आहेत. त्यामुळे भारतात तयार होणाऱ्या या वस्तू स्वस्त होतील. याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. म्हणजे आता भारतात तयार होणार आयफोन स्वस्त होऊ शकतो.

Web Title: budget 2025 what is cheap what is expensive full list of cheaper and costlier item gold silver mobile cancer drugs became cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.