Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2024: अर्थसंकल्पानंतर मजेशीर मीम्स व्हायरल; अशा आहेत सामान्यांच्या प्रतिक्रिया...

Budget 2024: अर्थसंकल्पानंतर मजेशीर मीम्स व्हायरल; अशा आहेत सामान्यांच्या प्रतिक्रिया...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 02:42 PM2024-02-01T14:42:22+5:302024-02-01T14:44:05+5:30

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

Budget 2024: Funny memes go viral after Budget; These are the general reactions... | Budget 2024: अर्थसंकल्पानंतर मजेशीर मीम्स व्हायरल; अशा आहेत सामान्यांच्या प्रतिक्रिया...

Budget 2024: अर्थसंकल्पानंतर मजेशीर मीम्स व्हायरल; अशा आहेत सामान्यांच्या प्रतिक्रिया...

Budget 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेमध्ये मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. दरवेळेप्रमाणेच, यंदाही मध्यमवर्गीयांच्या नजरा अर्थसंकल्पावर खिळल्या होत्या. टॅक्स स्लॅब्सबाबत दिलासा मिळण्याची अपेक्षा होती, मात्र यंदाही याबाबत सर्वसामान्यांची निराशा झाली. त्यामुळे अर्थसंकल्पाशी संबंधित मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या मीम्सद्वारे लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

अनिल कपूर आणि अमरीश पुरी यांच्या 'नायक' चित्रपटातील एका दृश्याचा फोटो एका यूजरने शेअर केला आहे. यामध्ये अमरीश पुरी दिसत असून, पोस्टरवर लिहिले आहे- 'ओरडत असतील तर त्यांना ओरडू द्या...आधी ओरडतील...मग थकतील आणि झोपी जातील.'

आणखी एका यूजरने क्रिकेट सामन्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर लिहिले- 'मध्यमवर्गाला दिलासा नाही.'

तिसऱ्या यूजरने 3 इडियट्स चित्रपटाची छोटी क्लिप शेअर केली. त्यावर लिहिले आहे - 'तुम्हाला नेमकं काय म्हणायचे आहे?'

चौथ्या यूजरने चित्रपटाचा व्हिडिओ पोस्ट करुन लिहिले - 'कोणतीही महत्त्वाची घोषणा नाही.'

पाचव्या यूजरने 'तारक मेहता...' शोची एक क्लिप शेअर केली आहे. त्याचे कॅप्शन आहे- 'मध्यमवर्गीय बजेट पाहिल्यानंतर.' 

आणखी एका युजरने चित्रपटाचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. 
 

Web Title: Budget 2024: Funny memes go viral after Budget; These are the general reactions...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.