Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2021: दारू शौकीनांसाठी 100 टक्क्यांचा झटका; हे आहेत बजेट 2021 मधील महत्वाचे मुद्दे

Budget 2021: दारू शौकीनांसाठी 100 टक्क्यांचा झटका; हे आहेत बजेट 2021 मधील महत्वाचे मुद्दे

बजेट 2021 मध्ये दारू आणि बीअरच्या किमती वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 04:07 PM2021-02-01T16:07:20+5:302021-02-01T16:17:26+5:30

बजेट 2021 मध्ये दारू आणि बीअरच्या किमती वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Budget 2021 govt increases tax on liquor with 100 percent cess; These are the key points in Budget 2021 | Budget 2021: दारू शौकीनांसाठी 100 टक्क्यांचा झटका; हे आहेत बजेट 2021 मधील महत्वाचे मुद्दे

Budget 2021: दारू शौकीनांसाठी 100 टक्क्यांचा झटका; हे आहेत बजेट 2021 मधील महत्वाचे मुद्दे

Highlightsया बजेटमध्ये अल्कोहॉलिक बेव्हरेजवर 100 टक्के अ‍ॅग्री इन्फ्रा सेस लावण्याची तरतूद करण्यात आली आहे.  तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता दारूच्या किमतीत मोठ्याप्रमाणावर वाढ होईल.शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी MSP पेक्षा 1.5 पट अधिक किंमत दिली जाईल.


नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतीचे दुःख दारू पिऊन दूर करायची तुमची इच्छा असेल, तर त्यासाठीही आता तुम्हाला बजेट प्रमाणे अधिकची किंमत मोजावी लागणार आहे. या बजेटमध्ये अल्कोहॉलिक बेव्हरेजवर 100 टक्के अ‍ॅग्री इन्फ्रा सेस लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

बजेट 2021 मध्ये दारू आणि बीअरच्या किमती वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आगामी अर्थिक वर्ष 2021-22 मध्ये दारूशी संबंधित पेय पदार्थांवरील सेस दर 100 टक्के वाढविला आहे. तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता दारूच्या किमतीत मोठ्याप्रमाणावर वाढ होईल.

हे आहेत बजेट 2021 मधील महत्वाचे मुद्दे -

- शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी MSP पेक्षा 1.5 पट अधिक किंमत दिली जाईल. शेतकऱ्यांना 75 हडार कोटी रुपये दिले जातील.

याच आर्थिक वर्षात LIC चा IPO आणला जाणार.

बँकांची NPA समस्या सोडविण्यासाठी AMC तयार करण्याची घोषणा

निर्गुंतवणुकीच्या कामांत आणखी तेजी आणणार, सरकार BPCL, CONCOR देखील विकणार.

गव्हाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. 

गव्हाचा MSP दीडपट करण्यात आला.

7 वर्षांत दुप्पटहून अधिक तांदळाची खरेदी केली. 

सरकारी बँकांमध्ये 20,000 कोटी रुपये टाकले जातील. 

इंफ्रा सेक्टरमध्ये 5.5 लाख कोटी रुपये खर्च केले जातील.

बँकांच्या NPA समस्येच्या पार्श्वभूमीवर 'बॅड बँक'ची घोषणा करण्यात आली.

विमा क्षेत्रात 74 टक्के FDI ला मंजुरी मिळाली.

ग्राहकांना आता आपल्या मर्जीने पावर डिस्ट्रीब्यूटरची निवड करता येईल. 

उज्ज्वला योजनेतून 8 कोटी लोकांना लाभ मिळाला, आता आणखी 1 कोटी नवे लोक जोडले जाणार.

जम्मू काश्मीरमध्ये गॅस पाईपलाइन प्रोजेक्टची सुरुवात करणार.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये निर्गुंतवणुकीच्या माध्यमाने 1.75 लाख कोटी रुपये जमवण्याचे उद्दीष्ट.

Web Title: Budget 2021 govt increases tax on liquor with 100 percent cess; These are the key points in Budget 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.