Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:16 IST

Strait of Hormuz : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ब्रेंट क्रूडने ११० डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून, WTI ने प्रति बॅरल ११३ डॉलर्सचा आकडा पार केला आहे.

Strait of Hormuz : मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक वळणावर पोहोचले असून त्याचे पडसाद जागतिक इंधन बाजारपेठेवर उमटू लागले आहेत. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्यामुळे मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. इराणने 'होर्मुजची सामुद्रधुनी' व्यापारासाठी खुली करण्यास नकार दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.

तेलाच्या किमतीत 'रॉकेट' गतीमंगळवारी जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांकी पातळी गाठली.ब्रेंट क्रूड : ५७ सेंट्सनी (०.५%) वाढून ११०.३४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.WTI क्रूड : १.२६ डॉलरनी (१.१%) वाढून ११३.६७ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला सज्जड दमअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. "जर इराणने होर्मुजचा सागरी मार्ग खुला केला नाही, तर त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास एका रात्रीत सर्व काही संपवून टाकू," असा कडक इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानमार्फत पाठवलेला अमेरिकेचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळून लावला आहे. इराणला केवळ युद्धविराम नको, तर हे युद्ध कायमचे संपलेले हवे आहे.

जगाचा २०% तेल पुरवठा धोक्यातजगातील एकूण तेल व्यापारापैकी २० टक्के व्यापार होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होतो. २८ फेब्रुवारीपासून हा मार्ग जवळपास बंद आहे. सोमवारी इराणच्या नौदलाने कतारच्या दोन गॅस जहाजांना अडवून त्यांना थांबण्याचे आदेश दिले. गेल्या गुरुवारपासून या मार्गावरून होणारी जहाजांची आवक-जावक अत्यंत मंदावली असून, यामुळे आशिया आणि युरोपमधील देशांना तेलासाठी पर्यायी स्त्रोत शोधावे लागत आहेत.

वाचा - युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे

क्षेपणास्त्र हल्ल्यांनी तणावात भरकेवळ इंधनच नाही, तर लष्करी हालचालींमुळेही परिस्थिती स्फोटक बनली आहे. इस्रायलने इराणची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्यामुळे दमास्कसमध्ये मोठे स्फोट झाले. सौदी अरेबियाने त्यांच्या पूर्व भागाकडे येणारी ७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत व्यापारी जहाजांच्या संरक्षणाबाबतचा प्रस्ताव चीनच्या विरोधामुळे कमकुवत झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Deadline to Iran: Open Hormuz or Face War!

Web Summary : Trump demands Iran open Hormuz Strait by 8 PM or face war. Rising oil prices, global supply chain fears escalate tensions. Asian nations concerned.
टॅग्स :अमेरिका-इस्रायल-इराण वॉरइंधन टंचाईएलपीजी गॅस टंचाईखनिज तेलइंधन दरवाढ