Tiger Shroff Pune Apartment Sold: बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी त्याचं कारण त्याचा चित्रपट नसून एक प्रॉपर्टी डील आहे. त्यानं पुण्यातील आपलं आलिशान अपार्टमेंट विकून मोठा नफा कमावलाय. ही डील दर्शवते की रिअल इस्टेटमधील गुंतवणूक देखील स्टार्ससाठी फायदेशीर ठरत आहे.
रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफनं मार्च २०२४ मध्ये हे अपार्टमेंट ७.५ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. आता ते ८.८७ कोटी रुपयांना विकून त्याने सुमारे १८ टक्के परतावा मिळवला आहे. इतक्या कमी वेळात मिळालेला हा नफा रिअल इस्टेट गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत चांगला मानला जात आहे.
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट?
पुण्यातील प्रीमियम प्रोजेक्टमध्ये होता फ्लॅट
हे अपार्टमेंट पुण्याच्या हडपसर भागातील 'Yoo Pune' प्रोजेक्टमध्ये होता, जो पंचशील रियल्टीनं विकसित केला आहे. सुमारे ४,२४९ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला हा फ्लॅट तीन पार्किंग स्पेससह विकला गेला. याची किंमत प्रति स्क्वेअर फूट सुमारे २०,८९१ रुपये राहिली.
भाड्याने दिला होता फ्लॅट
विशेष म्हणजे, ही प्रॉपर्टी आधी 'Cherise India Private Limited' ला भाड्याने देण्यात आली होती. कंपनी या फ्लॅटसाठी दरमहा सुमारे ३.५ लाख रुपये भाडं देत होती. आता त्याच कंपनीने हा फ्लॅट खरेदी केला आहे, ज्यामुळे ही डील अधिक खास बनली आहे.
बॉलीवूडमध्ये वाढत असलेली प्रॉपर्टी गुंतवणूक
अलीकडच्या काळात अनेक मोठे कलाकार रिअल इस्टेट डीलमुळे चर्चेत राहिले आहेत. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, प्रीती झिंटा आणि सोनाक्षी सिन्हा यांसारख्या ताऱ्यांनीही अलीकडेच करोडोंची मालमत्ता खरेदी किंवा विक्री केलीये. तज्ज्ञांचं असं मत आहे की, मोठ्या शहरांमधील मालमत्तेच्या वाढत्या किमती गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. विशेषतः लक्झरी प्रॉपर्टीमध्ये झपाट्यानं परतावा मिळत आहे.
Web Summary : Tiger Shroff sold his Pune apartment for ₹8.87 crore, earning an 18% profit on his ₹7.5 crore investment. The flat, located in the Yoo Pune project, was previously rented to Cherise India Private Limited, who then purchased it. Bollywood stars increasingly invest in real estate.
Web Summary : टाइगर श्रॉफ ने पुणे में अपना अपार्टमेंट ₹8.87 करोड़ में बेचा, जिससे उन्हें ₹7.5 करोड़ के निवेश पर 18% का मुनाफा हुआ। यू पुणे प्रोजेक्ट में स्थित यह फ्लैट पहले चेरीज़ इंडिया प्राइवेट लिमिटेड को किराए पर दिया गया था, जिसने बाद में इसे खरीद लिया। बॉलीवुड सितारे रियल एस्टेट में तेजी से निवेश कर रहे हैं।