Join us  

चिनी श्रीमंतांना मागे टाकत अब्जाधिशांच्या यादीत चमकले अंबानी-अदानी; जाणूनघ्या, जगात कितव्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 12:06 PM

गेल्या 15 दिवसांत अदानीच्या लिस्टेड 6 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसते.

नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे संस्थापक चेअरमन गौतम अदानी यांनी ग्लोबल वेल्थ रँकिंगमध्ये जॅक मा सारख्या चिनी अब्जाधिशांना मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्सच्या यादीनुसार, मुकेश अंबानी आणि अदानी यांची संपत्ती अनुक्रमे 84 अब्ज डॉलर आणि 78 अब्ज डॉलर झाली आहे. (Bloomberg billionaires index Ambani and Adani overtake chinese billionaires)

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 84 अब्ज डॉलर -ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 84 अब्ज डॉलर अर्थात 6.13 लाख कोटी रुपये एवढी आहे. ते जगातील 12 वे आणि आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच गौत आदानी यांची एकूण संपत्ती 78 अब्ज डॉलर अर्थात 5.69 लाख कोटी रुपये आहे. अर्थात यावेळी अदानी यांच्या संपत्तीत वेगाने वाढ झाली आहे. 

Ambani VS Adani: मुकेश अंबानींचा 'ताज' धोक्यात, गौतम अदानी लवकरच होऊ शकतात भारताचे नवे 'सरताज'

अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स वाढले -गेल्या 15 दिवसांत अदानीच्या लिस्टेड 6 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसते. अदानी ट्रांसमिशनचा शेअर 20 टक्क्यांपेक्षाही अधिक वधारला आहे. तर अदानी टोटल गॅसचा शेअर 35 टक्क्यांनी वाढला आहे. याच प्रकारे अदानी पावर गेल्या 3 दिवसांत 45 टक्क्यांपेक्षाही अधिक वाढला आहे.  अदानी इंटरप्राइजेस आणि अदानी पोर्टचेही शेअर्स मोठ्या प्रमाणावर वाधारले आहेत. यामुळेच अदानी यांच्या एकूण संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. याच बरोबर गेल्या आठवड्यात अचानक दोन दिवसांत रिलायन्सचा शेअरदेखील 10 टक्क्यांनी वाढला आहे. आता हा शेअर 2100 रुपयांच्यावर आहे.

जगातील या श्रीमंतांच्या यादीत अंबानी 12व्या तर अदानी 14व्या स्थानावर आहेत. बॉटल वॉटर किंग म्हणले जाणारे चीनचे सर्वात श्रीमंत बिझनेसमन झोंग शानशां 15व्या स्थानावर आहेत. ते डिसेंबर 2020 मध्ये आशियातीस सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते.

फक्त 7 दिवसांत पैसे डबल...! तुमच्या जवळ आहे का 'मालामाल विकली'चा हा शेअर?

इतर चिनी बिझनेसमनमध्ये टेंन्सेंटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा ह्यूटेन 21 व्या आणि अलिबाबाचे जॅक मा 27 व्या स्थानावर आहेत. या यादीत मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जे पुढे आहे, ते सर्व अमेरिकन उद्योगपती आहेत. विप्रोचे अजीम प्रेमजी 43 व्या आणि एचसीएलचे संस्थापक शिव नादर 70 व्या क्रमांकावर आहेत. या यादीत भारतीयांच्या तुलनेत चीनमधील श्रीमंतांची संख्या अधिक आहे. 

190 अब्ज डॉलरसह बेजोस पहिल्या क्रमांकावर - या यादीत अमेझॉनचे जेफ बेजोस 190 अब्जच्याडॉलरसह पहिल्या क्रमांकावर आहेत. फ्रेन्च नागरिक बर्नार्ड अर्नाल्ट दुसऱ्या, टेस्लाचे एलोन मस्क तिसऱ्या, बिल गेट्स चौथ्या तर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग पाचव्या स्थानावर आहेत. तसेच जगातील सर्वात श्रीमंत महिला फ्रँकोइस बेटेनकोर्ट या दहाव्या स्थानावर आहेत.

 

टॅग्स :मुकेश अंबानीअदानीचीनअमेरिकाभारत