Ambani VS Adani: मुकेश अंबानींचा 'ताज' धोक्यात, गौतम अदानी लवकरच होऊ शकतात भारताचे नवे 'सरताज'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 02:41 PM2021-06-06T14:41:19+5:302021-06-06T14:48:12+5:30

Bloomberg Billionaires Index नुसार, गौतम अदानी आता चीनच्या झोंग शैनशॅन यांना मागे टाकत आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. (How much return is given by Gautam Adani company group shares here is list of 6 company)

गौतम अदानी (Gautam Adani) यांची संपत्ती दिवसागणिक वाढतच चालली आहे. आता त्यांची संपत्ती एवढी वाढली आहे, की ते देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) अत्यंत जवळ पोहोचले आहेत आणि असेच चालू राहिल्यास ते मुकेश अंबानींनाही मागे टाकतील. अदानी यांच्या कंपनीच्या शेअर्सने तगडा रिटर्न (Share Return) दिला आहे. जाणून घेऊया, गौतम अदानींच्या कोणत्या कंपनीने दिले किती रिटर्न... (Ambani VS Adani How much return is given by gautam adani company group shares here is list of 6 company)

1- अदानी टोटल गॅसच्या शेअरने दिला 1800 टक्के रिटर्न - गौतम अदानी यांची कंपनी अदानी टोटल गॅसचे शेअर मार्च 2020 च्या खालच्या स्थरापासून आतापर्यंत 1825 टक्के वधारला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे शेअर बाजार क्रॅश झाला होता तेव्हा त्यांच्या शेअरची किंमत 85 रुपये एवढी होती. 4 जूनला अदानी टोटल गॅसच्या शेअरचा बंद झालेला दर 1637 रुपये एवढा होता. ज्या लोकांनी अदानींच्या या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या आनंदाला आज पारावार नाही.

2- जवळपास 1400 टक्क्यांनी वधारला अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडचा शेअर - अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडच्या शेअरनेही जबरदस्त नफा मिळवला आहे. अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडचा शेअर मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे गडगडून 115 रुपयांवर आला होता. 4 जूनरोजी या शेअरचा बंद भाव 1700 रुपये एवढा होता. अर्थात या दरम्यान अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1378 टक्क्यांचा जबरदस्त रिटर्न दिला आहे.

3- अदानी ट्रांसमिशनने दिला 700 टक्क्यांहून अधिक रिटर्न - मार्च 2020 च्या खालच्या पातळीचा विचार करता, या कंपनीचा शेअर आतापर्यंत जवळपास 765 टक्क्यांपेक्षाही अधिक रिटर्न दिला आहेत. मार्च 2020मध्ये कंपनीचा शेअर 185 रुपये होता, तर 4 जूनला याचा बंद भाव 1602 रुपयांवर गेला होता. या कंपनीनेही गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

4- अदानी ग्रीन एनर्जीने गुंतवणूक दारांना दिला 964 टक्के नफा - गत वर्षी कोरोना महामारीमुळे शेअर बाजार गडगडल्यानंतर मार्च 2020 मध्ये अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर जवळपास 120 रुपयांवर आला होता. 4 जूनला या शेअरचा बंद भाव जवळपास 1277 रुपये एवढा होता. म्हणजेच, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरने या काळात गुंतवणूकदारांना 964 टक्के रिटर्न दिले. केवळ 15 महिन्यांतच 964 टक्के रिटर्न खूपच छान आहे.

5- अदानी पॉवरनेही दिला जबरदस्त रिटर्न- कोरोनामुळे गेल्या वर्षी जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर गडगडले होते. यात अदानी पॉवरचे शेअर्सदेखील घसरले होते. मार्च 2020 मध्ये त्याची किंमत जवळपास 22 रुपयांपर्यंत घसरली होती. 4 जूनला या कंपनीच्या शेअरचा बंद भाव 105 रुपये एवढा होता. अशाप्रकारे जवळपसा 15 महिन्यांच्या कालावधीत शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 377 टक्के रिटर्न दिले आहेत.

6- अदानी पोर्ट्सने दिला 300 टक्क्यांहून अधिक रिटर्न - गेल्यावर्षी शेअर बाजार क्रॅश झाल्यानंतर अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोनचा शेअर मार्च 2020 मध्ये घसरून जवळपास 200 रुपयांच्या आपल्या खालच्या पातळीवर पोहोचला होता. 4 जूनला कंपनीच्या या शेअरचा बंद भाव जवळपास 833 रुये होता. म्हणजेच या काळात कंपनीने जवळपास 316 टक्के रिटर्न दिला आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन ही अदानी ग्रुपची सर्वात कमी रिटर्न देणारी कंपनी होती आणि तोही रिटर्न जबरदस्त होता.

मुकेश अंबानींच्या अगदी जवळ - श्रीमंतांच्या यादीत वेगाने वर सरकत चाललेले गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींच्या अत्यंत जवळ पोहोचले आहेत. आता गौतम अदानींची एकूण संपत्ती 75.2 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. तर मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 85 अब्ज डॉलर आहे.

जर, गौतम अदानींची संपत्ती याच वेगाने वाढत राहीली, तर ते लवकरच मुकेश अंबानी यांना मागे टाकून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होतील. 6 जूनला जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी 12व्या क्रमांकावर आहेत. तर गौतम अदानी हे 13व्या क्रमांकावर आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजने दिला केवळ 222 टक्के रिटर्न - गेल्या वर्षी शेअर बाजारातील घसरणीमुळे रिलायन्सचा शेअरदेखील घसरला होता आणि तो मार्च 2020 मध्ये जवळपास 875 रुपयांवर आला होता. 4 जूनला कंपनीच्या या शेअरचा बंद भाव जवळपास 2190 रुपये होता. अर्थात, यादरम्यान कंपनीने 150 टक्कांचा रिट्न दिला. या रिटर्नची तुलना गौतम अदानी यांच्या कंपन्यांशी केल्यास मुकेश अंबानी दूर-दूरपर्यंत कुठेही दिसत नाहीत.

अदानी कंपन्यांत सर्वात कमी रिटर्न अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोनने दिला होता आणि तोही 316 टक्के होता. म्हणजेच अदानी यांच्या सर्वात वाईट प्रदर्शन करणाऱ्या कंपनीचे रिटर्नदेखील मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा दुप्पटीने अधिक होते.

Bloomberg Billionaires Index नुसार, गौतम अदानी आता चीनच्या झोंग शैनशॅन यांना मागे टाकत आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.