Join us

Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 16:25 IST

Defence stocks: आज २२ ऑक्टोबरला शेअर बाजारात जोरदार विक्री झाली असून, त्याचा परिणाम डिफेन्स शेअर्समध्येही दिसून आला आहे.

Defence stocks: आज २२ ऑक्टोबरला शेअर बाजारात जोरदार विक्री झाली असून, त्याचा परिणाम डिफेन्स शेअर्समध्येही दिसून आलाय. या क्षेत्रातील स्मॉल आणि मिडकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स आणि इंडिया डायनॅमिक्स या कंपन्यांचं समभाग आज ५ ते १० टक्क्यांपर्यंत घसरले. 

गेल्या दोन वर्षांत या संरक्षण क्षेत्रातील कंपन्याच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली आहे. याशिवाय हिंदुस्थान एरोनॉटिक्स, इंडिया इलेक्ट्रॉनिक्स, पारस डिफेन्स आणि अॅस्ट्रा मायक्रोवेव्ह या सारख्या इतर संरक्षण कंपन्यांच्या शेअर्सवरही दबाव असून ते ३-५ टक्क्यांपर्यंत घसरले.

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

ओमनीसायन्स कॅपिटलचे सीईओ आणि मुख्य गुंतवणूक सल्लागार विकास गुप्ता म्हणतात की, डिफेन्स शेअर्सची फंडामेंटल मजबूत राहते. त्यांच्याकडे मजबूत महसूल, नफा, वाढीची क्षमता आणि ५-१० वर्षांची ऑर्डर बुक आहे. काही प्युअर प्ले डिफेन्स स्टॉक्स अजूनही मूल्यांकनाच्या दृष्टीकोनातून आकर्षक दिसत असले तरी अनेक शेअर्समध्ये अधिक तेजी आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक असणाऱ्यांकडे क्रिएटिव्हीटी आणि मॉडर्न जिओ स्टॅटजीमधील समज असणं आवश्यक आहे. एनर्जी सिक्युरिटी, रेयर अँड स्ट्रॅटजिक मटेरिअल, डिफेन्स फोर्सला सपोर्ट करणारी लॉजिस्टिक चेन आणि पार्ट्स सारख्या स्ट्रॅटजिक ग्लोबल लोकेशनसाठी फायनान्शिअल आणि अन्य सपोर्ट सारख्या बाबींचाही विचार केला जाऊ शकतो, असं गुप्ता म्हणाले.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :संरक्षण विभागशेअर बाजार