What Gets Cheaper and What Becomes Costlier: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग ९ व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत विक्रम केला. जगातील पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून नऊ वेळा बजेट सादर करण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे. रविवार असूनही सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत, तर काही क्षेत्रांत महागाईचा फटका बसणार आहे.
काय स्वस्त झाले?
१. आरोग्य आणि औषधे: गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कॅन्सर आणि मधुमेहाच्या १७ महत्त्वाच्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे. तसेच ७ दुर्मिळ आजारांची औषधेही स्वस्त होणार आहेत.
२. गॅस आणि इंधन: वाहनधारकांसाठी सीएनजी आणि बायोगॅस स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच विमानाच्या इंधनावरील करात कपात केल्याने विमान प्रवासही सुसह्य होण्याची शक्यता आहे.
३. इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्स: 'मेक इन इंडिया'ला चालना देण्यासाठी भारतात तयार होणारे स्मार्टफोन आणि टॅबलेट स्वस्त होतील. तसेच मोबाईल बॅटरी, लिथियम आयन सेल आणि माइक्रोवेव्ह ओव्हनच्या किमतीत घट होणार आहे.
४. ऊर्जा आणि पर्यावरण: सोलर एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी सोलर ग्लास आणि सोलरशी संबंधित साहित्य स्वस्त करण्यात आले आहे. तसेच इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरी स्वस्त झाल्याने प्रदूषणमुक्त प्रवासाला वेग येईल.
५. लाईफस्टाईल आणि इतर वस्तू:
फूटवेअर आणि लेदर: चामड्याच्या वस्तू, चप्पल, बूट आणि लेदर बॅग स्वस्त होतील.
कपडे आणि कापड: सिन्थेटिक कापड आणि रेडिमेड कपड्यांच्या किमती कमी होतील.
खेळ: तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी खेळाचे साहित्य स्वस्त करण्याचा प्रस्ताव आहे.
काय महागले?
मद्यप्रेमींना फटका: बजेटमधील वाढीव शुल्कामुळे परदेशी दारूच्या किमती वाढतील.
शेअर मार्केट: शेअर बाजारात ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता जास्त टॅक्स द्यावा लागेल, ज्यामुळे ट्रेडिंग महाग पडणार आहे.
खनिज आणि स्क्रॅप: खनिज पदार्थ आणि भंगार वरील ड्युटी वाढवल्याने संबंधित क्षेत्रातील वस्तू महागू शकतात.
| काय स्वस्त झाले? | काय महागले? |
| कॅन्सर-मधुमेहाची १७ औषधे | परदेशी दारु |
| सीएनजी आणि बायोगॅस | शेअर मार्केटमधील ऑप्शन ट्रेडिंग |
| स्मार्टफोन आणि टॅबलेट | खनिजे |
| सोलर पॅनल आणि सोलर ग्लास | मेटल स्क्रॅप |
| लेदरचे बूट आणि बॅग | लक्झरी घड्याळे |
| माइक्रोवेव्ह ओव्हन | |
| इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी |
नवीन किमती कधीपासून लागू होणार?
अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या वस्तूंच्या किमती (उदा. औषधे, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स) १ एप्रिल २०२६ पासून अधिकृतपणे बदलतील. मात्र, कस्टम ड्युटीतील कपातीचा फायदा काही कंपन्या उत्पादन खर्च कमी होताच तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यामुळे काही दिवसांतच इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत किरकोळ घट दिसून येऊ शकते.
मोबाईल आणि गॅजेट्स किती स्वस्त होतील?
स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या किमतीत घट होण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत. मोबाईलच्या काही सुट्या भागांवरील आणि बॅटरीवरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे ब्रँडेड फोन्सच्या किमती साधारणपणे ५ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. तसेच सॅमसंग, ॲपल आणि शाओमी यांसारख्या कंपन्यांचे भारतात तयार होणारे मॉडेल्स अधिक स्वस्त मिळतील. उदाहरणार्थ, जर एखादा फोन ३०,००० रुपयांना असेल, तर तो १,५०० ते ३,००० रुपयांनी स्वस्त होऊ शकतो.
Web Summary : Budget 2026 brings mixed news. Some medicines, CNG, electronics, and footwear become cheaper. Foreign liquor, share trading, and minerals will cost more. Changes effective April 1st.
Web Summary : बजट 2026 में मिली-जुली खबर है। कुछ दवाएं, सीएनजी, इलेक्ट्रॉनिक्स और जूते सस्ते होंगे। विदेशी शराब, शेयर ट्रेडिंग और खनिज महंगे होंगे। बदलाव 1 अप्रैल से प्रभावी।