Join us

अदानींच्या श्रीमंतीत मोठी वाढ, चीनला मागे टाकले आता अंबानींशी स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 16:50 IST

अदानी ग्रुपच्या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्य बीएससीमध्ये 5 टक्क्यांचे अपर सर्किट पाहायला मिळालं. गेल्या 1 महिन्यात अदानी ट्रान्समिशन यांचे शेअर 67 टक्क्यांनी वाढले आहेत.

ठळक मुद्देगौतम अदानी यांची एकूण संपत्ती 67.1 अब्ज डॉलर नेटवर्थ एवढी आहे. यापूर्वी 14 जून रोजी त्यांची संपत्ती 77 अब्ज डॉलरवर पोहोचली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी अदानी ग्रुपच्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मंदी पाहायला मिळाली.

नवी दिल्ली - भारत आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे, जगभरातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते पुढे-पुढे येत आहेत. विशेष म्हणजे अदानींच्या गतीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबांनी यांचे स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे.  Bloomberg Billionaires Index च्या सर्वेक्षणानुसार अदानी सध्या 14 व्या स्थानी आहेत. अदानी यांनी चीनच्या झोंग शैनशैन या मागे टाकले असून ते आशियात 2 ऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक बनले आहेत.

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 67.1 अब्ज डॉलर नेटवर्थ एवढी आहे. यापूर्वी 14 जून रोजी त्यांची संपत्ती 77 अब्ज डॉलरवर पोहोचली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी अदानी ग्रुपच्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मंदी पाहायला मिळाली. त्यामुळे, ते आशिया खंडातील श्रीमंतांच्या यादीत 25 व्या क्रमांकावर पोहोचले होते. 

अदानी ग्रुपच्या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्य बीएससीमध्ये 5 टक्क्यांचे अपर सर्किट पाहायला मिळालं. गेल्या 1 महिन्यात अदानी ट्रान्समिशन यांचे शेअर 67 टक्क्यांनी वाढले आहेत. अदानी कंपनीच्या इतरही कंपन्यांमधील शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अदानी पॉवर (Adani Power) च्या शेअर्समध्ये 4.98 टक्के, ग्रुपच्या फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राइजेज (Adani Enterprises) च्या शेअर्समध्ये 0.40 टक्के, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनमिक झोन (Adani Ports and Special Economic Zone) च्या शेअर्समध्ये 0.17 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) च्या शेअर्समध्ये 0.85 टक्क्यांची तेजी आली आहे. त्यामुळे अदानीच्या नेटवर्थमध्येही 1.93 अब्ज डॉलरचे तेजी आहे. 

भारत आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानीचे जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 12 वे स्थान आहे. Bloomberg Billionaires Index त्यांची नेटवर्थ 87.5 अब्ज डॉलर एवढी आहे. यावर्षी त्यांच्या नेटवर्थमध्ये 10.8 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. सोमवारी रिलायन्सच्या शेअर्समध्ये 1.94 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. कंपनीचा शेअर 16 डिसेंबर 2020 रोजी 2369 रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचला होता.  

टॅग्स :अदानीमुकेश अंबानीरिलायन्स