Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या भावात मोठी घसरण; तर चांदीच्या दरातही हजार रुपयांची कपात; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 15:34 IST

 बुधवारी एकाच दिवसात चांदीच्या भावात थेट १२०० रुपयांनी वाढ होऊन ती ५१ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली होती.

नवी दिल्ली : बुधवारी एकाच दिवसात मोठी भाववाढ झालेल्या सोने चांदीत गुरुवारी लगेच मोठी घसरण होऊन सुवर्ण बाजारात पडझड झाली. गुरुवारी सोन्याच्या भावात ८०० रुपयांची घसरण होऊन ते ४९,२०० तर चांदीत १००० रुपयांची घसरण होऊन ५०,५०० रुपयांवर आली. अमेरिकन बँकांसह विदेशातील विविध बँकांनी व्याजदर शून्य केल्याने सोने चांदीत गुंतवणूक वाढून बुधवारी मोठी भाववाढ झाली होती. यात सोने ७०० रुपयांनी वधारून ४९,३०० रुपयांवरून ५०,००० हजार रुपये प्रति तोळा झाले होते तर चांदीत १२०० रुपयांची वाढ होऊन ती ५०,३०० रुपयांवरून ५१,५०० रुपये प्रति किलो वर पोहचली होती. मात्र मोठ्या प्रमाणात भाववाढ असल्याने खरेदीदारांनी हात आखडता घेतला व मागणी कमी झाली. परिणामी गुरुवारी सोने चांदीचे भाव गडगडले.

 बुधवारी एकाच दिवसात चांदीच्या भावात थेट १२०० रुपयांनी वाढ होऊन ती ५१ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली होती. सोन्याच्याही भावात एकाच दिवसात ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. कोरोनामुळे आवक कमी व भारत-चीनमधील तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने वाढ सुरूच आहे. त्यात अमेरिकासह विदेशातील विविध बँकांनी व्याजदर शून्य केल्याने गुंतवणूकदारांचा कल सोने-चांदीकडे वाढला आहे. २७ जून रोजी सोने-चांदीचे भाव एकसारखे होऊन ते ४९ हजार ३०० रुपयांवर आले होते. त्यानंतर मंगळवारी चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ५० हजार ३०० रुपयांवर येत ५० हजारांचा पल्ला ओलांडला होता. सोन्याचे भाव मात्र ४९ हजार ३०० रुपयांवर स्थिर होते. बुधवार १ जुलै रोजी तर चांदीच्या भावात थेट १२०० रुपयांनी वाढ होऊन ती ५१ हजार ५०० रुपयांवर पोहोचली.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सुवर्णबाजार सुरू झाला तरी चांदीची आवक कमी असल्याने तिचे भाव वाढतच होते. त्यात सोन्याच्याही भावात झपाट्याने वाढ होत गेली. मागणी कायम असल्याने २७ रोजी सोन्यात ४०० रुपयांनी वाढ होऊन ते ४९ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. दुसरीकडे चांदीत ६०० रुपयांची घसरण होऊन तीदेखील ४९ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर आली होती.

हेही वाचा

SBIचा ग्राहकांना अलर्ट! ATMमधून पैसे काढण्याचे नियम बदलले; जाणून घ्या अन्यथा बसेल फटका

अखेर शिवराजसिंह चौहानांच्या मंत्रिमंडळाचा 'जंबो' विस्तार; जाणून मंत्र्यांची संपूर्ण लिस्ट

...म्हणून मोदींच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल; शिवसेनेची अ‍ॅपबंदीवर 'टिक', पण भाजपाला 'टोक'लं!

मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन २०३६पर्यंत रशियावर सत्ता गाजवणार

चीनची कबुली! भारतात TikTok अ‍ॅप बंद झाल्यानं होणार अब्जावधी डॉलरचं नुकसान

कोरोना देशातून जाणार नाही, जुलै अन् ऑगस्टमध्ये मोठा फैलाव होणार, भारतीय संशोधकांचा गंभीर इशारा

बापरे! कोरोनापाठोपाठ नव्या संकटाचा वैज्ञानिकांचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना

आजचे राशीभविष्य - 2 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवनात सुखांचा अनुभव मिळेल

टॅग्स :सोनं