Join us

चीनला मोठा धक्का; Apple भारतात उत्पादन वाढणार, 2 लाख तरुणांना नोकरी देणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 19:54 IST

Apple मुळे 2020 पासून भारतात 1.65 लाख रोजगार निर्माण झाले आहेत.

Apple Jobs : चीनवरील अवलंबन कमी करण्यासाठी Apple सातत्याने भारतात आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. याच दिशेने Apple मार्च 2025 पर्यंत भारतात 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. त्यापैकी 70 % महिलांसाठी राखीव असतील. विशेष म्हणजे, Apple चे विक्रेते आणि पुरवठादारांनी 2020 पासून भारतात 1.65 लाख रोजगार निर्माण केले आहेत. 2023-2024 मध्ये भारतातील iPhone चे उत्पादन 1.20 लाख कोटीपर्यंत पोहोचले आहे.

Apple च्या व्यवसाय वाढीमुळे भारतात 2 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. अलीकडेच, एका अहवालात म्हटले आहे की, Apple भारतातील सर्वात मोठा ब्लू-कॉलर रोजगार निर्माता म्हणून उदयास आला आहे. Apple चे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर्स फॉक्सकॉन, विस्टरॉन (आता टाटा इलेक्ट्रॉनिक्स) आणि पेगाट्रॉन यांनी भारतात पहिल्या 80,872 लोकांना थेट रोजगार दिले आहेत. तर टाटा ग्रुप, मद्रासन, फॉक्सलिंक (तामिळनाडू), सनवोडा (उत्तर प्रदेश), सायलॉम, एटीएल (हरियाणा) आणि जेबिल (महाराष्ट्र) इत्यादी सप्लायर्सनी सुमारे 84,000 थेट रोजगार निर्माण केले आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात रोजगाराच्या संधीApple आपले भारतातील उत्पादन वाढवत आहे, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. देशातील आयफोनचे उत्पादन 1.20 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर 85,000 ची निर्यात केली आहे. भारतात आता संपूर्ण जगाच्या 14% आयफोन तयार केले जातात. 2022-23 मध्ये हा टक्का फक्त 7% होता. 2021 मध्ये Apple ने भारतात आयफोनचे उत्पादन करण्यास सुरवात केली. तेव्हापासून भारतातील आयफोनचे उत्पादन सतत वाढत आहे, तर चीनमधील उत्पादन हळुहळू कमी होत आहे. हा चीनसाठी मोठा धक्का आहे. कारण, अॅपलमुळे चीनमधील सूमारे चाळीस लाख लोकांना रोजगार मिळतो.

 

टॅग्स :अॅपलव्यवसायनोकरीकर्मचारी