Join us
Daily Top 2Weekly Top 5

घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:53 IST

Bharat Dynamics Share News : संरक्षण कंपनी भारत डायनॅमिक्सच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. कंपनीचे शेअर्स रॉकेटसारखे वाढत आहेत.

Bharat Dynamics Share News : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात निराशाजनक वातावरण आहे. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मात्र, या घसरणीच्या वातावरणातही एका संरक्षण क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने रॉकेटच्या वेगाने उसळी घेतली आहे. ही कंपनी आहे भारत डायनेमिक्स.

२००० कोटींच्या ऑर्डरचा परिणामसकाळी ११:३० च्या सुमारास, बीएसईवर भारत डायनेमिक्सचा शेअर १,६०८.४५ रुपयांवर ट्रेड करत होता. यात ५.९३ टक्के (९० रुपये) इतकी मोठी वाढ दिसून आली. कंपनीच्या स्टॉकने व्यवहाराची सुरुवात हिरव्या निशाणीवर १,५९०.१० रुपयांवर केली होती. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २,०९६ आहे, तर नीचांक ८९७.१५ रुपये आहे.

तेजीमागील मुख्य कारणेगुरुवारी कंपनीला २,००० कोटी रुपयांच्या 'इनवार अँटी-टँक क्षेपणास्त्रां'ची मोठी ऑर्डर मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत कंपनीचे आर्थिक निकाल अत्यंत मजबूत*राहिले. पुरवठा साखळीतील सुधारणांमुळे कंपनीच्या कामाला गती मिळाली, ज्यामुळे निकालांना बळ मिळाले.

ब्रोकरेज फर्मचा विश्वासमोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, भारत डायनेमिक्सच्या शेअर्समध्ये पुढील एका वर्षात ३२ टक्क्यांपर्यंत तेजी येऊ शकते. फर्मने या शेअरसाठी खरेदीचा सल्ला कायम ठेवला असून, लक्ष्य भाव १,९०० रुपयांवरून वाढवून २,००० रुपये केली आहे. ब्रोकरेज फर्मने असा अंदाज व्यक्त केला आहे की, कंपनीच्या नफ्यात येत्या तीन वर्षांत मोठी वाढ दिसून येईल.

संरक्षण क्षेत्रातील 'आत्मनिर्भर भारत' धोरणांना मिळालेल्या गतीमुळे भारत डायनेमिक्ससारख्या कंपन्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसत आहे.

वाचा - नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Bharat Dynamics share shines amid market fall; buy now?

Web Summary : Bharat Dynamics shares surged despite a weak market, fueled by a ₹2,000 crore order and strong financials. Brokerage firm Motilal Oswal suggests a potential 32% upside, setting a target price of ₹2,000. 'Atmanirbhar Bharat' initiative boosts defense sector growth.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकसंरक्षण विभाग