Join us

महाकुंभामुळे मागणी वाढली अन् टाटा समूहाचा शेअर बनला रॉकेट, किंमत ₹ 10000 च्या पुढे..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 22:03 IST

Benares Hotels Ltd Share : यावर्षी आतापर्यंत या शेअरने 25.53% परतावा दिला आहे.

Benares Hotels Ltd Share : काही काळापासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे, पण या घसरत्या बाजारातही टाटा समूहाच्या एका शेअरमध्ये जोरदार वाढ दिसून येत आहे. आज हा शेअर 7.22 टक्क्यांनी वाढून 10 हजार रुपयांच्या पुढे गेला. आम्ही ज्या शेअरबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव बनारस हॉटेल्स लिमिटेड (Benares Hotels Ltd) आहे. या शेअरने YTD दरम्यान देखील चांगला परतावा दिला आहे. 

यावर्षी दमदार परतावाबनारस हॉटेलच्या शेअर्सने 2025 मध्ये 25.53% परतावा दिला आहे. तर, गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 32 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच, वर्षभरात 14 टक्के आणि 5 वर्षात तब्बल 522 टक्के परतावा दिला आहे. या स्टॉकमध्ये अलीकडेच वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे महाकुंभातील वाढती गर्दी.

बाजारात व्यापक मंदी असूनही, टाटा समूहाच्या बनारस हॉटेल्सच्या मार्च तिमाहीत (Q4FY25) महसूल वाढ होण्याची अपेक्षा आहे. बनारस हॉटेल्समध्ये जानेवारीमध्ये 25 टक्के वाढ झाली, त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 0.3 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली. या महिन्याच्या सुरुवातीला नोंदवलेल्या ₹11,800 च्या सार्वकालिक उच्चांकावरून हा 10.5 टक्क्यांनी खाली आला आहे.

कंपनी काय करते?बनारस हॉटेल्स लिमिटेड 1971 मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. या कंपनीचे वाराणसीमध्ये ताज गंगा आणि नादेसर पॅलेस, महाराष्ट्रातील जिंजर हॉटेलसह लक्झरी आणि बजेट हॉटेल्स आहेत. 2011 मध्ये कंपनी The Indian Hotels Company Limited (IHCL) ची उपकंपनी बनली. IHCL ची या फर्ममध्ये 49.53 टक्के भागीदारी होती.

(टीप- कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत नक्की घ्या.)

टॅग्स :टाटाशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूककुंभ मेळा