Stock Market Bull Run: २०२६ मध्ये सेन्सेक्स (Sensex) कुठपर्यंत पोहोचू शकतो, याबद्दल गेल्या २-३ महिन्यांमध्ये अनेक ब्रोकरेज फर्म्सनी भविष्यवाणी केल्या आहेत. कोणी ८९,००० चा स्तर येईल, तर कोणी ९५,००० चा स्तर दिला आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीनं (Morgan Stanley) आता, भारतीय शेअर बाजार २०२६ मध्ये पुन्हा एकदा तेजी पकडू शकतो, असं म्हटलंय. कंपनीनं आपल्या बुल केसमध्ये डिसेंबर २०२६ पर्यंत सेन्सेक्सचे लक्ष्य १,०७,००० ठेवले आहे. याचा अर्थ आत्ताच्या स्तरापासून जवळपास २७ टक्के वाढ अपेक्षित आहे आणि मोठी आर्थिक स्थिती तसेच सरकारी धोरणं बाजारासाठी अनुकूल राहिल्यास हे शक्य होईल, असं म्हटलंय.
हे अंदाज बाजाराची स्थिती, आर्थिक विकास, धोरणात्मक बदल आणि जागतिक घटनांवर आधारित असतात. बहुतेक फर्म सकारात्मक आहेत, परंतु बाजाराशी संबंधित जोखीम जसं की कच्च्या तेलाच्या किमती किंवा अमेरिकेतील व्यापार तणाव यांचा उल्लेख देखील करतात.
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
ब्रोकरेज फर्म्सचे अंदाज
मॉर्गन स्टॅनलीनंच ऑगस्ट २०२५ मध्ये जून २०२६ पर्यंत ८९,००० चा बेस केस (Base Case) टारगेट दिला होता. त्यानंतर ५ नोव्हेंबर २०२५ रोजी या अंदाजात सुधारणा करत बुल केसमध्ये १,००,००० आणि बेस केसमध्ये ८५,००० चा अंदाज व्यक्त केला होता, जो कमाईतील वाढ आणि सुधारणांवर आधारित होता. त्याचप्रमाणे, एचएसबीसीनं सप्टेंबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये वर्षाच्या अखेरपर्यंत ९४,००० चं टार्गेट ठेवलं होतं, जो ओव्हरवेट (Overweight) रेटिंगसह १३ टक्के वाढ दर्शवत होता. गोल्डमॅन सॅक्सनं (Goldman Sachs) ९ नोव्हेंबर २०२५ रोजी निफ्टीच्या २९,००० च्या बरोबरीचा सेन्सेक्स जवळपास ९६,००० पर्यंत पोहोचण्याचा अंदाज लावला होता.
मॉर्गन स्टॅनलीच्या ताज्या अंदाजानुसार तेजी कधी?
मॉर्गन स्टॅनलीच्या ताज्या अंदाजानुसार (डिसेंबर २०२६), सेन्सेक्स १,०७,००० चा उच्चांक तेव्हा गाठेल जेव्हा कच्चं तेल (क्रूड ऑइल) ६५ डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी राहतील, जगभरातील टॅरिफ कमी होऊ लागतील, सरकारची धोरणं महागाई नियंत्रित ठेवून विकासाला प्रोत्साहन देतील आणि भारतीय अर्थव्यवस्था जलद गती कायम ठेवेल. जर हे घडले, तर FY25 ते FY28 दरम्यान सेन्सेक्समधील कंपन्यांची कमाई वार्षिक जवळपास १९ टक्क्यांच्या दरानं वाढू शकते, ज्यामुळे शेअर्सच्या किमतींना मजबूत आधार मिळेल.
सामान्य आणि खराब स्थितीतील अंदाज
या ब्रोकरेज फर्मच्या बेस केसमध्ये २०२६ च्या अखेरीस सेन्सेक्स ९५,००० पर्यंत जाऊ शकतो, म्हणजेच जवळपास १३ टक्के वाढ अपेक्षित आहे. हे अंदाज भारतीय अर्थव्यवस्था स्थिर राहणं, सरकारनं फिस्कल डिसिप्लिन कायम ठेवणं, खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक चांगली असणं, जागतिक विकास स्थिर राहणे आणि देशांतर्गत लिक्विडिटी चांगली होणे, ज्यात व्याजदर कपातीचाही समावेश आहे, या आधारांवर आहे. या परिस्थितीत FY28 पर्यंत कंपन्यांची कमाई जवळपास १७ टक्के वार्षिक वाढ देऊ शकते. याउलट, बेअर केसमध्ये (खराब स्थिती) सेन्सेक्स ७६,००० पर्यंत खाली येऊ शकतो. हे तेव्हा होईल जेव्हा तेलाच्या किमती १०० डॉलरच्या वर जातील, व्याजदर आणखी वाढवले जातील आणि परदेशात मागणी कमी होऊन एकूण वातावरण कमकुवत असेल.
काय म्हणताहेत एक्सपर्ट
मॉर्गन स्टॅनलीचे विश्लेषक रिधम देसाई आणि नयंत पारेख यांचं म्हणणं आहे की, भारताच्या धोरणांमधील बदल आणि चांगल्या विकासाच्या अपेक्षेमुळे शेअर बाजारात पुन्हा जान येण्याची शक्यता आहे. रिधम देसाई यांच्या मते, "गेल्या ३० वर्षांतील सर्वात खराब कामगिरीनंतर, आम्ही २०२६ मध्ये भारतीय इक्विटी पुन्हा मजबूत होताना पाहत आहोत. धोरणांमधील बदलांमुळे नाममात्र वाढीला वेग मिळेल, ज्यामुळे गेल्या १२ महिन्यांच्या कमाईची मंद गती संपेल. विदेशी गुंतवणूकदारांचा सहभाग सध्या ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी आहे, त्यामुळे पुढील कामगिरी चांगली दिसू शकते."
रिपोर्टमध्ये म्हटलंय आहे की, येत्या काळात व्याजदरांमध्ये कपात होऊ शकते, बाजारात लिक्विडिटी वाढू शकते आणि जीएसटीमध्ये सवलत यांसारखी पाऊलं शेअर बाजारात पुढील तेजीची कारणं बनू शकतात. भारताचं बाह्य क्षेत्र (External Sector) देखील मजबूत होत आहे, कारण तेलावरील अवलंबन कमी होत आहे आणि सेवांची निर्यात चांगली सुरू आहे. हे सर्व भारताला एक स्थिर आणि आकर्षक बाजार बनवते. यासोबतच, मजबूत धोरणात्मक वातावरण, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग देखील देशाला दुसऱ्या उदयोन्मुख देशांपेक्षा वेगळे बनवतो.
गुंतवणुकीचा दृष्टिकोन
ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की भारतीय बाजारपेठेत डोमेस्टिक सायक्लिकल सेक्टर्स (जसे की बँकिंग, ग्राहक खर्च, इंडस्ट्रियल्स) चांगले प्रदर्शन करतील. ते फायनान्शियल्स, कंझ्युमर डिस्क्रेशनरी आणि इंडस्ट्रियल्स वर ओव्हरवेट आहेत, तर एनर्जी, मटेरियल्स, युटिलिटीज आणि हेल्थकेअर वर अंडरवेट आहेत. रिपोर्टचा निष्कर्ष असा आहे की, पुढे बाजार मॅक्रो फॅक्टर्स म्हणजेच मोठ्या आर्थिक परिस्थितीनुसार चालेल आणि फक्त निवडक स्टॉक्स निवडण्याची रणनीती तितकी महत्त्वाची राहणार नाही.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी विषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Brokerage firms predict Sensex could reach 1,07,000 by 2026, driven by favorable economic conditions. Morgan Stanley anticipates a 27% surge if crude oil prices stay low and government policies support growth. Analysts suggest domestic cyclical sectors may outperform, advising caution and expert consultation before investing.
Web Summary : ब्रोकरेज फर्मों का अनुमान है कि अनुकूल आर्थिक परिस्थितियों के चलते 2026 तक सेंसेक्स 1,07,000 तक पहुंच सकता है। मॉर्गन स्टेनली को 27% उछाल की उम्मीद है अगर कच्चे तेल की कीमतें कम रहें और सरकारी नीतियां विकास का समर्थन करें। विश्लेषकों का सुझाव है कि घरेलू चक्रीय क्षेत्र बेहतर प्रदर्शन कर सकते हैं, निवेश से पहले सावधानी और विशेषज्ञ की सलाह लेने की सलाह दी जाती है।