Join us
Daily Top 2Weekly Top 5

BCCL IPO Allotment Status: बीसीसीएल आयपीओ अलॉटमेंट आज, तुम्हाला मिळालाय का शेअर; GMP किती? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 10:50 IST

BCCL IPO Allotment Status Today: भारत कोकिंग कोलचा IPO ९ जानेवारीला उघडला होता आणि १३ जानेवारीला बंद झाला. NSE च्या आकडेवारीनुसार, कंपनीनं ३४.६९ कोटी शेअर्स ऑफर केले होते.

Bharat Coking Coal IPO Allotment Status: भारत कोकिंग कोलचा (Bharat Coking Coal) IPO ९ जानेवारीला उघडला होता आणि १३ जानेवारीला बंद झाला. NSE च्या आकडेवारीनुसार, कंपनीनं ३४.६९ कोटी शेअर्स ऑफर केले होते, ज्याच्या बदल्यात गुंतवणूकदारांनी ५,०९३.१६ कोटी शेअर्ससाठी बोली लावली. यावरून या IPO ला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

हा IPO किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांनी ४९.२५ पट सबस्क्राइब केला. मोठ्या संस्थागत गुंतवणूकदारांनी (QIB) ३१०.८१ पट, हाय नेटवर्थ गुंतवणूकदारांनी (NII) २५८ पट आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या हिस्स्यात ५.१७ पट सबस्क्रिप्शन मिळालं. याव्यतिरिक्त, भागधारकांनी ८७.२ पट सबस्क्राईब केला. ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळाले नाहीत, त्यांचे पैसे कंपनी १५ जानेवारी रोजी परत करेल. ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळतील, त्यांच्या डिमॅट खात्यात १४ जानेवारीला शेअर्स ट्रान्सफर केले जाण्याची शक्यता आहे. भारत कोकिंग कोलच्या शेअर्सचे लिस्टिंग १६ जानेवारी (शुक्रवार) रोजी BSE आणि NSE वर होण्याची शक्यता आहे.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन

GMP किती?

भारत कोकिंग कोलच्या आयपीओला असलेल्या उच्च मागणीमुळे त्याच्या शेअर्सना ग्रे मार्केटमध्ये जोरदार प्रीमियम मिळत आहे. ग्रे मार्केटचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइट्सनुसार, आज भारत कोकिंग कोलच्या आयपीओचा जीएमपी (GMP) प्रति शेअर ₹१३.४ आहे. याचा अर्थ असा की, ग्रे मार्केटमध्ये भारत कोकिंग कोलचे शेअर्स त्यांच्या इश्यू किमतीपेक्षा प्रति शेअर ₹१३.४ नं अधिक किमतीवर विकले जात आहेत.

IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासावं?

गुंतवणूकदार BSE, NSE आणि रजिस्ट्रार KFin Technologies च्या वेबसाइटवर जाऊन त्यांचे अलॉटमेंट स्टेटस ऑनलाइन पाहू शकतात. यासाठी पॅन (PAN), ॲप्लिकेशन नंबर किंवा डिमॅट खात्याची माहिती आवश्यक असेल.

सर्वात आधी BSE च्या IPO अलॉटमेंट वेबसाइटवर जा.

'Issue Type' मध्ये जाऊन ‘Equity’ निवडा.

'Issue Name' च्या यादीतून ‘Bharat Coking Coal Ltd’ निवडा.

तुमचा ॲप्लिकेशन नंबर किंवा पॅन (PAN) नंबर टाका.

कॅप्चा व्हेरिफिकेशन पूर्ण करा आणि त्यानंतर 'Search' वर क्लिक करा; तुमचं अलॉटमेंट स्टेटस दिसून येईल.

IPO ची माहिती

पूर्ण इश्यू: ऑफर फॉर सेल (OFS)

प्राईस बँड: ₹२१ ते ₹२३ प्रति शेअर

रिटेल लॉट साईज: ६०० शेअर्स

किमान गुंतवणूक: ₹१३,८००

कंपनीबद्दल सविस्तर माहिती

भारत कोकिंग कोल लिमिटेडची (BCCL) स्थापना १९७२ मध्ये झाली. ही कंपनी कोकिंग कोल, नॉन-कोकिंग कोल आणि वॉश्ड कोलचं उत्पादन करते. याचा मुख्य व्यवसाय स्टील आणि पॉवर क्षेत्राशी संबंधित असून ही कंपनी 'कोल इंडिया लिमिटेड'ची (Coal India Ltd) उपकंपनी आहे. BCCL कडे ७.९१ अब्ज टन कोळशाचा साठा आहे, जो भारताच्या देशांतर्गत कोकिंग कोलच्या सुमारे ५८.५% हिस्सा आहे. कंपनीचं कोळसा उत्पादन आर्थिक वर्ष २०२२ मधील ३०.५१ दशलक्ष टनांवरून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ४०.५० दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे.

BCCL स्टील क्षेत्रासाठी आवश्यक असलेला कोकिंग कोल उपलब्ध करून देऊन भारताचं आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. कोल इंडियाची उपकंपनी असल्याने BCCL ला भक्कम संचालन क्षमता आणि नियामक पाठबळ मिळते.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : BCCL IPO Allotment Today: Check Status, GMP, and Details Here

Web Summary : Bharat Coking Coal IPO saw strong subscription. Allotment status can be checked online. GMP is ₹13.4. Listing expected on BSE/NSE January 16. Retail lot size is 600 shares.
टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूकपैसाशेअर बाजार