Join us
Daily Top 2Weekly Top 5

१ एप्रिलपासून बदलणार ATM चे नियम! पाहा काय असेल Free आणि कशाचे लागतील पैसे, 'या' ३ बँकांनी जारी केले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 08:46 IST

ATM New Rules 1st April: जर तुम्ही वारंवार एटीएममधून पैसे काढत असाल किंवा कार्ड घरी विसरल्यावर युपीआयद्वारे रोख रक्कम काढत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

ATM New Rules 1st April: १ एप्रिलपासून केवळ नवीन आर्थिक वर्ष सुरू होत नाही, तर काही नवे नियम देखील येणार आहेत. जर तुम्ही वारंवार एटीएममधून पैसे काढत असाल किंवा कार्ड घरी विसरल्यावर युपीआयद्वारे रोख रक्कम काढत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील ३ मोठ्या बँकांनी त्यांच्या ग्राहकांना धक्का देत व्यवहाराच्या मर्यादा आणि शुल्कामध्ये बदल केलेत.

१. एचडीएफसी (HDFC) बँक : युपीआयवरून रोख रक्कम काढणे 'महागात' पडणार

  • HDFC बँकेने कार्डलेस (कार्डशिवाय) रोख रक्कम काढणाऱ्यांसाठी नियम कडक केले आहेत. 
  • मासिक मर्यादेत समावेश: आता तुम्ही फोननं स्कॅन करून जी रोख रक्कम काढता, ती वेगळी न धरता तुमच्या महिन्याच्या ५ मोफत (Free) व्यवहारांमध्येच गणली जाईल.
  • अतिरिक्त शुल्क: जर तुमची महिन्याची मोफत मर्यादा संपली असेल, तर युपीआयद्वारे रोख रक्कम काढल्यास तुम्हाला प्रति व्यवहार ₹२३ + जीएसटी द्यावा लागेल.
  • जुना नियम: स्वतःच्या एटीएमवर ५ मोफत व्यवहार आणि इतर बँकांच्या एटीएमवर मेट्रो शहरांत ३ व नॉन-मेट्रो शहरांत ५ मोफत व्यवहारांची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

२. पीएनबी (PNB): पैसे काढण्याची दैनंदिन मर्यादा झाली अर्धी

  • पंजाब नॅशनल बँकेनं सुरक्षा आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'कॅश'वर कात्री चालवली आहे.
  • मर्यादेत कपात: प्रीमियम डेबिट कार्ड्सवरील दैनंदिन पैसे काढण्याची मर्यादा थेट ५०% ने कमी करण्यात आली आहे.
  • प्लॅटिनम/गोल्ड/बिझनेस कार्ड: पूर्वी तुम्ही ₹१ लाख काढू शकत होतात, आता केवळ ₹५०,००० काढू शकाल.
  • सिलेक्ट/सिग्नेचर कार्ड: पूर्वीची ₹१.५ लाखांची मर्यादा आता कमी होऊन फक्त ₹७५,००० राहिली आहे.

३. बंधन बँक: शहरांनुसार नवीन नियम

  • बंधन बँकेनं आपल्या व्यवहारांच्या संरचनेत पूर्णपणे बदल केला आहे.
  • स्वतःच्या एटीएमवर: महिन्यात केवळ ५ वेळा पैसे काढणं मोफत असेल. शिल्लक रक्कम तपासणं मोफत राहील.
  • इतर बँकांच्या एटीएमवर : मेट्रो शहरे (दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद) महिन्यात केवळ ३ वेळा मोफत व्यवहार करता येतील.
  • नॉन-मेट्रो शहरे: महिन्यात ५ वेळा मोफत व्यवहारांची सुविधा मिळेल.
  • इतर बँकांच्या एटीएमवर शिल्लक रक्कम तपासणं देखील या मोफत मर्यादेमध्येच गणलं जाईल.
English
हिंदी सारांश
Web Title : ATM Rules Changing April 1st: Free Limits & Charges Defined!

Web Summary : New ATM rules from April 1st! HDFC, PNB, and Bandhan Bank have revised ATM usage limits and charges. UPI cash withdrawals now count towards HDFC's free limit. PNB halved daily withdrawal limits for premium cards. Bandhan Bank altered free transactions based on location.
टॅग्स :एटीएमपैसाएचडीएफसी