Anil Ambani Reliance Power : कधीकाळी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेले उद्योगपती अनिल अंबानी यांनी गेल्या वर्षभरात कमाल केली आहे. अनेक कंपन्यांची कर्ज फेडली असून नवीन कामेही मिळत आहे. याचा परिणाम आता शेअर बाजारातही पाहायला मिळत आहे. सध्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीचा शेअर रॉकेट बनला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये एकाच दिवसात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण, हा शेअर अचानक इतका का वाढला? आगामी काळात शेअरची कामगिरी कशी असेल? चला जाणून घेऊया.
रिलायन्स पॉवरच्या नफ्यात वाढकंपनीच्या डिसेंबर तिमाहीचे निकाल नुकतेच समोर आले. यामध्ये कंपनीने एकूण ४१.९५ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला १,१३६.७५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर एका उपकंपनीच्या विघटनातून ३,२३०.४२ कोटी रुपयांचा नफा झाला. कंपनीचा ऑपरेशन महसूल ४.६ टक्क्यांनी घसरून १,८५२ कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी, खर्च ३३ टक्क्यांनी घटून २,१०९.५६ कोटी रुपये झाला.
अंबानींच्या या कंपनीला तोटा
रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या राजस्थान सन टेक एनर्जीची आर्थिक स्थिती चांगली दिसत नाही. कारण तिने कर्ज फेडण्यात चूक केली आहे. कंपनीला सातत्याने नुकसान होत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार सर्वकाही सुरळीत सुरू असून कर्ज सोडविण्यासाठी कंपनीशी बोलणी सुरू आहेत. अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरला गेल्या वर्षी या तिमाहीत १,१३६.७५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
रिलायन्स पॉवर शेअर्सचा RSI (रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स) ४९.५ आहे. जो सामान्य पातळीवर आहे. बुधवारी कंपनीच्या शेअर्सची किंमत ३९.९ रुपये होती. यावर्षी आतापर्यंत शेअर्स ११ टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या दोन वर्षांत २३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल १६,०२३ कोटी रुपये आहे. कंपनीने एकूण ४१.९५ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.