Join us
Daily Top 2Weekly Top 5

10 कंपन्या, बिहार ते लंडनपर्यंत साम्राज्यविस्तार; अनिल अग्रवाल म्हणाले - आता आयुष्य काढायचे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:43 IST

Anil Agarwal Son Dies: वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यावर मुलाच्या अपघानी निधाने दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Anil Agarwal Son Dies: दिग्गज भारतीय अद्योगपती आणि वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचे अमेरिकेत अकस्मिक निधन झाले. न्यूयॉर्कमध्ये स्कीइंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या 49व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बिहारपासून लंडनपर्यंतचा यशस्वी प्रवास

साध्या कुटुंबातून पुढे येत जागतिक स्तरावर उद्योगसम्राट म्हणून ओळख निर्माण करणारे अनिल अग्रवाल हे भारतीय उद्योगविश्वातील मोठे नाव आहे. Vedanta Group चे संस्थापक असलेल्या अग्रवाल यांनी खाणकाम व खनिज क्षेत्रात मोठे साम्राज्य उभे केले आहे. 

बिहारमध्ये जन्म, मुंबईत व्यवसायाची सुरुवात अन् पुढे लंडनपर्यंत पोहोचलेला त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांची वेदांता रिसोर्सेस पीएलसी ही London Stock Exchange वर सूचीबद्ध होणारी पहिली भारतीय कंपनी ठरली होती. 10 डिसेंबर 2003 रोजी कंपनीचे लिस्टिंग झाले होते.

संपत्ती आणि उद्योगविस्तार

फोर्ब्सच्या रिअल-टाइम बिलेनियर्स इंडेक्सनुसार अनिल अग्रवाल यांची एकूण संपत्ती सुमारे 3.3 अब्ज डॉलर (सुमारे 30 हजार कोटी रुपये) आहे. तर, वेदांता लिमिटेडची बाजार भांडवल किंमत 2.23 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. खनिज व धातू क्षेत्रासोबतच सेमीकंडक्टर क्षेत्रातही वेदांता समूहाने अलीकडच्या काळात महत्त्वाची पावले उचलली आहेत.

मुलाच्या मृत्यूवर अनिल अग्रवाल भावूक...

मुलाच्या निधनानंतर अनिल अग्रवाल यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. ते लिहितात, “अग्निवेश, आपल्याला अजून खूप काही करायचे होते. तुझी इतकी स्वप्ने, इतक्या आकांक्षा होत्या. सगळेच अपूर्ण राहिले. तुझ्याविना आता आयुष्य कसे काढायचे, हेच कळेना.”

अनिल अग्रवाल 75% संपत्ती दान करणार...

अनिल अग्रवाल यांनी मुलाच्या निधनानंतर त्यांची 75% संपत्ती समाजाला दान करण्याचे जाहीर केले आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "माझे आणि अग्निवेशचे एक स्वप्न होते. कोणतेही मूल उपाशी झोपू नये, कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि प्रत्येक तरुण भारतीयाला चांगले काम मिळावे. मी अग्निवेशला वचन दिले होते की, जे काही कमवू त्याच्या 75% पेक्षा जास्त आम्ही समाजाला परत देऊ."

कुटुंबात आता कोण ?

अग्निवेश अग्रवाल हे वेदांता समूहातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते. ते समूहाची उपकंपनी Talwandi Sabo Power Limited च्या संचालक मंडळावर होते. त्यांच्या पश्चात पत्नी किरण, मुलगी प्रिया आणि भाऊ नवीन अग्रवाल असा परिवार आहे.

मुलगी प्रिया हेब्बार यांची जबाबदारी

अनिल अग्रवाल यांची कन्या प्रिया हेब्बार या वेदांता बोर्डाच्या सदस्य आहेत. त्या Hindustan Zinc Limited च्या अध्यक्षा असून वेदांता लिमिटेडमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणूनही कार्यरत आहेत. ब्रिटनमधील वारविक विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल्या प्रिया या इन्व्हेस्टर रिलेशन्स आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनसारख्या महत्त्वाच्या विभागांचे नेतृत्व करतात. 2013 मध्ये त्यांचा विवाह आकाश हेब्बार यांच्याशी झाला असून त्यांना माही नावाची एक मुलगी आहे.

देश-विदेशात वेदांता समूहाचा विस्तार

वेदांता समूह हा जागतिक नैसर्गिक संसाधन क्षेत्रातील मोठा उद्योगसमूह आहे. लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या वेदांता रिसोर्सेस लिमिटेडअंतर्गत भारतासह आफ्रिकेतील अनेक देशांत समूहाचे व्यवहार सुरू आहेत.

समूहाच्या प्रमुख कंपन्यांमध्ये हिंदुस्तान जिंक, बाल्को, केर्न ऑइल अँड गॅस, स्टरलाइट कॉपर, ईएसएल स्टील, तलवंडी साबो पॉवर लिमिटेड यांचा समावेश आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झांबिया येथेही वेदांता समूहाचे खाणकाम प्रकल्प कार्यरत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Anil Agarwal Loses Son; Expansive Journey Ends in Heartbreak

Web Summary : Vedanta Group chairman Anil Agarwal's son, Agnivesh, passed away unexpectedly in America at 49. Agarwal mourns, pledging 75% of his wealth to society, fulfilling a shared dream. He leaves behind his wife, daughter, and brother.
टॅग्स :व्यवसायभारतलंडनअपघात