Join us

ना लंडन, ना अबुधाबी; 'या' ठिकाणी होणार अनंत आणि राधिकाचे लग्न, पाहुण्यांची यादी पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 19:05 IST

Ambani Family: मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.

Anant Ambani and Rahika Merchant wedding Date: दिग्गज उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी, यांचा धाकटा मुलगा अनंतच्या लग्नाचा 'प्री-वेडिंग' सोहळा अतिशय थाटामाटात साजरा झाला. भारतासह जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी या शाही सोहळ्यात हजेरी लावली. गुजरातच्या जामनगरमध्ये तीन दिवस चाललेल्या ग्रँड सोहळ्यानंतर आता अंबानी कुटुंबाने अनंतच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. शाही प्री-वेडिंगनंतर आता सर्वांच्या नजरा अनंत आणि राधिकाच्या लग्नाकडे लागल्या आहेत. लग्नाच्या ठिकाणाबाबत अनेक बातम्या येत आहेत.

कुठे होणार अनंत आणि राधिकाचं लग्न?दावा केला जात होता की, अनंत आणि राधिकाचे लग्न लंडनमध्ये तर संगीत सोहळा अबुधाबीमध्ये होणार आहे. पण आता या प्लॅनमध्ये बदल झाल्याची बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत आणि राधिकाचे लग्न लंडन किंवा अबुधाबीमध्ये होणार नाही. अंबानी कुटुंबातील धाकट्या मुलाचे लग्न भारतात होणार आहे. अनंत आणि राधिका मुंबईतच सात फेरे घेतील. 

अनंत-राधिकाचे लग्न 12 जुलै रोजी होणार पंतप्रधान मोदींच्या 'वेड इन इंडिया'च्या आवाहनाला प्रतिसाद देताना अंबानी कुटुंबांने अनंत आणि राधिकाचे लग्न भारतात करण्याचे ठरवले. त्यामुळेच हा सोहळा मुंबईतच पार पडणार आहे. मात्र, याबाबत अंबानी कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. येत्या 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका विवाह बंधनात अडकतील. या लग्नासाठी नीता अंबानी विशेष तयारी करत आहेत.

कोण-कोण पाहूणे येणार?अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी खास निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींसह उद्योग, क्रिडा, राजकारण आणि इतर क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना विशेष निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. शाहरुख खान, सलमान खान, बच्चन कुटुंब, विराट कोहली, अनुष्का शर्मा, विकी कौशल, कतरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक बड्या स्टार्सचा समावेश असेल. याशिवाय बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टीफन श्वार्जमन, बॉब इगर, इवांका ट्रम्प यांच्यासह अनेक परदेशी पाहुणे सहभागी होऊ शकतात.

टॅग्स :मुकेश अंबानीअनंत अंबानीलग्नभारतव्यवसाय