Join us  

लष्करात तीन वर्ष ट्रेनिंग देण्याच्या उपक्रमाचे आनंद महिंद्रांकडून समर्थन; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 3:18 PM

त्याअंतर्गत तरुण, तंदुरुस्त नागरिकांना ऐच्छिक आधारावर सैन्यात किंवा अधिकारी म्हणून लष्करात भरती करून ऑपरेशनल अनुभव (स्वयंसेवा अनुभव) घेण्याची संधी मिळेल.

ठळक मुद्दे देशातील नामांकित उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी तीन वर्षांपासून सैन्यात सेवा देणाऱ्या तरुणांना नोकरीत सामावून घेण्याची ऑफर दिली आहे. जर हे केले तर तीन वर्षांपासून सैन्यात ‘टूर ऑफ ड्यूटी’ करत असलेल्या तरुणांना त्यांच्या समूहात स्थान दिलं जाईल. भारतीय सैन्य दलात निवड व प्रशिक्षण या कडक मानकांचा विचार करता महिंद्रा ग्रुप लष्करी प्रशिक्षण घेत असलेल्या तरुणांना कामावर घेण्याबाबत विचार करेल.

नवी दिल्लीः देशातील नामांकित उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी तीन वर्षांपासून सैन्यात सेवा देणाऱ्या तरुणांना नोकरीत सामावून घेण्याची ऑफर दिली आहे. इतकेच नव्हे तर महिंद्रांनी भारतीय लष्कराला एक ईमेल लिहून असे म्हटले आहे की, जर हे केले तर तीन वर्षांपासून सैन्यात ‘टूर ऑफ ड्यूटी’ करत असलेल्या तरुणांना त्यांच्या समूहात स्थान दिलं जाईल.  "नुकतेच मला कळले की भारतीय सैन्य 'टूर ऑफ ड्युटी'च्या नव्या प्रस्तावावर विचार करीत आहे." त्याअंतर्गत तरुण, तंदुरुस्त नागरिकांना ऐच्छिक आधारावर सैन्यात किंवा अधिकारी म्हणून लष्करात भरती करून ऑपरेशनल अनुभव (स्वयंसेवा अनुभव) घेण्याची संधी मिळेल, असंही लष्कराला लिहिलेल्या मेलमध्ये त्यांनी उल्लेख केला आहे. महिंद्रा लिहितात, "मला खात्री आहे की, सैनिकी प्रशिक्षण घेतल्यानंतर जेव्हा तो कामाच्या ठिकाणी येतो, तेव्हा ते खूप फायदेशीर ठरते." भारतीय सैन्य दलात निवड व प्रशिक्षण या कडक मानकांचा विचार करता महिंद्रा ग्रुप लष्करी प्रशिक्षण घेत असलेल्या तरुणांना कामावर घेण्याबाबत विचार करेल. प्रत्यक्षात कर्तव्याच्या दौ-याच्या प्रस्तावावर नागरिकांच्या सेवेची भावना वाढवण्यासाठी आणि सामान्य लोकांना भारतीय सैन्याबरोबर जोडण्यासाठी विचार केला जात आहे. हा ठराव संमत झाल्यास देशाच्या इतिहासातील हे एक मोठे क्रांतिकारक पाऊल असेल. त्याअंतर्गत तरुणांना तीन वर्षांसाठी देशाची सेवा करण्याची संधी दिली जाईल आणि यामुळे लष्कराच्या कोट्यवधी रुपयांची बचत होईल.या प्रस्तावावर सध्या लष्करी अधिका-यांमध्ये चर्चा सुरू आहे, परंतु लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांच्या मते हे मंजूर झाल्यास पहिल्या टप्प्यात १०० अधिकारी आणि १००० जवानांची चाचणी प्रकल्प म्हणून नियुक्ती केली जाईल. सुरुवातीला, 100 अधिकारी आणि एक हजार जवानांना चाचणीच्या आधारावर तीन वर्षांसाठी सैन्यात ड्युटीवर ठेवण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून भारतीय लष्कराला देशातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा असलेले तरुण सेवेत समाविष्ट करता येतील. सध्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून सैन्यात भरती झालेल्यांना किमान 10 वर्षे काम करावे लागेल. लष्करातील उच्च अधिकारी हे तरुणांना अधिक आकर्षक बनविण्यासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या तरतुदींचा आढावा घेत आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : त्यांना कर्ज देणारं पॅकेज नको, तर खिशात पैसा द्या, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

कौतुकास्पद! एका रुपयात इडली विकणार्‍या अम्माला शेफ विकास खन्नांचं सरप्राईज गिफ्ट

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाक राबवत असलेल्या योजनांना भारताचा विरोध; इम्रान सरकारला दिला गंभीर इशारा

Lockdown 4.0चं काऊंटडाऊन; आपल्या राज्याला कुठल्या सवलती मिळणार?

CoronaVirus news : कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती, लॉकडाऊन हटवणं पडू शकतं महागात- तज्ज्ञ

CoronaVirus news : केंद्राच्या धरसोडवृत्तीमुळेच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; अमोल कोल्हेंची मोदी सरकारवर टीका

अमेरिका मैत्रीला जागला! भारताला व्हेंटिलेटर देणार अन् मिळून कोरोनाला हरवणार

प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू

...म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, शिवसेनेचा भाजपाला टोला

टॅग्स :भारतीय जवान