Join us

"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 14:27 IST

Trump on Iphone Production in India: आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी ॲपल भारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणार आहे. परंतु आता त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय.

आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी अॅपलभारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणार आहे. परंतु आता त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय. यात त्यांनी ॲपलला भारतात आयफोन तयार करण्याचा सल्ला दिलाय. भारताला त्यांच्या हिताची काळजी घेऊ द्या, असं ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितलं. भारतानं काही अमेरिकन वस्तूंवर शून्य शुल्काची ऑफर दिली आहे तर दुसरीकडे ॲपल भारतात आपली उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आखत असताना हे विधान करण्यात आलं आहे.

"मी काल टिम कुक यांच्याशी चर्चा केली. आम्ही तुमची चांगली काळजी घेत आहोत. तुम्ही ५०० अब्ज डॉलर्सची कंपनी बनवत आहात. परंतु तुम्ही भारतात उत्पादन प्रकल्प उभारत आहात, असं मी ऐकलंय. तुम्ही ते भारतात उभारू नये असं मला वाटतं. जर तुम्हाला भारताची मदत करायची असेल तर ठीक आहे. परंतु भारत हा जगातील सर्वाधिक शुल्क आकारणारा देश आहे. त्या ठिकाणी विक्री करणं कठीण आहे. भारतानं आम्हाला आमच्या काही सामानांवर शुल्क न आकारण्याची ऑफर दिली आहे," असं ट्रम्प म्हणाले. दोहा येथे ट्रम्प यांनी अनेक व्यावसायिकांची भेट घेतली.

एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?

आणखी काय म्हणाले ट्रम्प?"आम्ही तुमच्या चीनमधल्या उत्पादन प्रकल्पांना वर्षानुवर्ष सहन केलं. परंतु आता तुम्ही भारतात उत्पादन प्रकल्प उभारू नये असं आम्हाला वाटतं. भारत आपली काळजी घेऊ शकतो. तो चांगलं करू शकतो. तुम्ही अमेरिकेतच उत्पादन प्रकल्प उभारा," असं ट्रम्प म्हणाले.

याचा अर्थ काय?

ट्रम्प यांचं हे विधान त्यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचं प्रतिबिंब आहे. ॲपलसारख्या बड्या ब्रँडनं अमेरिकेत गुंतवणूक करावी जेणेकरून तिथे नोकऱ्या वाढतील, अशी त्यांची इच्छा आहे. भारतात ॲपल फॉक्सकॉन आणि टाटा यांच्या सहकार्यानं आयफोन बनवत आहे. २०२५ मध्ये भारतात तयार होणाऱ्या आयफोनपैकी १५ टक्के आयफोन अमेरिकेत पाठवले जाणार आहेत. ट्रम्प यांचे हे वक्तव्य भारताच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमासाठी आव्हान ठरू शकतं.

टॅग्स :अॅपलडोनाल्ड ट्रम्पअमेरिकास्मार्टफोनभारत