Join us

Amazon Quiz : Amazon देतेय ३० हजार रुपये जिंकण्याची संधी, करावं लागेल केवळ एवढं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 20:15 IST

Amazon Quiz : अ‍ॅमेझॉनने तुम्हाला रोख बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अ‍ॅमेझॉनवर दररोज अ‍ॅप क्विझचे आयोजन केले जाते. यामध्ये सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन तुम्ही अ‍ॅमेझॉन पेमध्ये बक्षीस जिंकू शकता.

मुंबई - अ‍ॅमेझॉनने तुम्हाला रोख बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अ‍ॅमेझॉनवर दररोज अ‍ॅप क्विझचे आयोजन केले जाते. यामध्ये सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन तुम्ही अ‍ॅमेझॉन पेमध्ये बक्षीस जिंकू शकता. आज म्हणजेच ७ जानेवारी रोजी तुम्ही सर्व पाच प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन तुम्ही लकी विनर ठरू शकता. विनर बनल्यास तुम्हाला ३० हजार रुपयांचं बक्षीस मिळेल.

हे बक्षीस तुम्हाला अ‍ॅमेझॉन पे बॅलन्समध्ये दिलं जाईल. विजेत्याचा निर्णय हा लकी ड्रॉच्या माध्यमातून घेण्यात येईल.  अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विझमध्ये प्रश्न जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर संबंधित असतील. 

हे अ‍ॅप ओन्ली क्विझ आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करावे लागेल. अ‍ॅमेझॉन अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयफोन दोन्ही प्रकारच्या युझर्ससाठी उपलब्ध आहे.

अ‍ॅप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही यामध्ये तुमच्या अकाऊंटमधून लॉगइन करा. त्यानंतरअ‍ॅपमध्ये फन झोन सेक्शनमध्ये जा. ते तुम्ही सर्च करूनसुद्धा थेट ओपन करू शकता. फन झोन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या सेक्शनमध्ये रेड कलरचा बॅनर दिसेल. यामध्ये अन्सर आणि विन लिहिलेलं असेल. त्यावर क्लिक करून तुम्ही हा क्विझ खेळू शकता.

हा क्विझ संपूर्ण दिवसासाठी व्हॅलिड असेल. तसेच यामध्ये बहुतांश एकच विनर असतो. विनरचा निर्णय लकी ड्रॉच्या माध्यमातून केला जातो. आजच्या विनरची घोषणा उद्या म्हणजेच आठ तारखेला होईल.  

टॅग्स :अ‍ॅमेझॉनपैसाभारत