Join us
Daily Top 2Weekly Top 5

Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 10:55 IST

Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: बॉलिवूड चित्रपट 'धुरंधर'ने सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील अक्षय खन्नाची एन्ट्री असलेलं गाणं FA9LA (फस्ला) खूप व्हायरल झालंय. पाहूया याचा गायक कोण आहे आणि त्याची संपत्ती किती आहे?

Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: बॉलिवूड चित्रपट 'धुरंधर'ने सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटापेक्षा अधिक चर्चा रहमान डकैत ही भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाच्या अभिनयाची होत आहे. या चित्रपटातील त्याची एन्ट्री असलेलं गाणं FA9LA (फस्ला) खूप व्हायरल झालंय आणि या गाण्यानं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

विशेष म्हणजे, हे गाणं बहरीनचा रॅपर हुसाम असीम (Hussam Aseem) यानं गायलंय. त्याला फ्लिपरॅची (Flipperachi) या नावानंही ओळखलं जातं. बहरीनी-मोरक्कन अशी पार्श्वभूमी असलेला हुसाम, खलीज हिप-हॉप मधील प्रमुख आवाजांपैकी एक आहे. ही एक अशी शैली आहे जी अरबी संगीतामध्ये आधुनिक बीट्सचं मिश्रण करते. हुसाम असीमची एकूण संपत्ती कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?

२००३ मध्ये करिअरला सुरुवात

हुसाम असीमने किशोरावस्थेत असतानाच रॅपमध्ये प्रभुत्व मिळवलं आणि २००३ मध्ये व्यावसायिकरित्या या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. 'धुरंधर'मध्ये असलेले त्याचे 'फस्ला' हे गाणं मागील वर्षी प्रदर्शित झाले होतं. त्याने २०२४ मध्ये 'बहरीनी आर्टिस्ट ऑफ द ईयर' हा पुरस्कारही जिंकला. त्याची इतर प्रसिद्ध गाणी म्हणजे 'शूफहा', 'शिनो अलकलाम हथा', 'अंटी जमीला' आणि 'नायदा'. 'फस्ला' गाण्यामुळे त्याची लोकप्रियता भारतातही लक्षणीय वाढली आहे.

रॅपरने व्यक्त केला आनंद

रॅपर हुसाम असीम उर्फ फ्लिपरॅचीचे 'FA9LA' गाणं भारतातील घराघरात पोहोचले आहे. 'धुरंधर' चित्रपटातील हे गाणं एक सनसनाटी बनले आहे आणि या गाण्यावर इन्स्टाग्राम रील्स देखील मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत. आता स्वतः रॅपरने भारतीय चाहत्यांसाठी एक खास संदेश शेअर केला आहे. फ्लिपरॅचीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या गाण्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबतच्या संवादात फ्लिपरॅचीनं सांगितलं की, त्याचे गाणं भारतात खूप व्हायरल होत आहे आणि त्यानं एका व्हिडीओमध्ये हे गाणं शेअरही केलं आहे.

किती आहे एकूण संपत्ती आणि कमाई?

फ्लिपरैची गाण्यांमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. Popnable वेबसाइटनुसार, २०२५ मध्ये त्याची कमाई सुमारे २.४८ लाख डॉलर (जवळपास २.२५ कोटी रुपये) असण्याचा अंदाज आहे. तर, २०२४ मध्ये त्याने सुमारे ४.१९ लाख डॉलर (सुमारे ३.८० कोटी रुपये) इतकी कमाई केली होती. याचप्रमाणे, २०२३ मध्ये सुमारे १० हजार डॉलर, २०२२ मध्ये सुमारे ४.३२ लाख डॉलर, २०२१ मध्ये सुमारे ४.२० लाख डॉलर आणि २०२० मध्ये १६.४ हजार डॉलर कमाई केली होती. २०१९ मध्ये त्याची कमाई ५ लाख डॉलरपेक्षा जास्त होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Flipperachi's FA9LA song goes viral; Know his net worth

Web Summary : Rapper Flipperachi's FA9LA song from 'Dhurandhar' is viral. His net worth is crores. He earned ₹3.80 crore in 2024. Flipperachi expressed joy over song's popularity in India.
टॅग्स :बॉलिवूडपैसाअक्षय खन्ना