Join us

AI for Investment: आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी एआय खरंच उपयुक्त आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 21:55 IST

कृत्रिम बुद्धिमता हा विषय आजच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा बनू लागला आहे. अनेक क्षेत्रात त्याचा वापर वाढू लागला आहे. लोकही वेगवेगळ्या कामासाठी याचा वापर करू लागले आहेत. पण, आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी याचा वापर करावा का?

आज अनेक तरुण आणि गुंतवणूकदार एआयचा वापर सल्ल्यासाठी करत आहेत. हे इन्फोग्राफिक दाखवते की एआय कशात मदत करतो, कुठे कमी पडतो आणि कंपन्या त्याचा वापर कसा करत आहेत. लक्षात ठेवा - एआय असिस्टंट आहे, पर्याय नाही.

आर्थिक क्षेत्रात एआयचा वापर?

एएमसी आणि फंड मॅनेजर - स्टॉक्सची निवड, जोखीम आणि बाजाराचा मूड ओळखण्यासाठी एआय वापरत आहेत. 

मायक्रोसॉफ्ट कोपायलट - केलेला खर्च लक्षात ठेवतो आणि बजेटचे नियोजन कसे करायचे यासाठी एआय वापरतो.

झिरोधा - एआय-आधारित अकाउंट सुरक्षा आणि माहिती देण्यासाठी वापरत आहे.

मिराज असेट - कंपन्यांची रैंकिंग ठरवण्यासाठी आणि थीमॅटिक फंड्स तयार करण्यासाठी एआय वापरत आहे.

एआय कशात मदत करू शकते?

बजेटिंग आणि खर्चाचा मागोवा ठेवणे. एसआयपी आणि पोर्टफोलिओचे विश्लेषण करणे. स्टॉक्स आणि फंड्समधील ट्रेंड लगेच ओळखणे. मोठ्या डेटावरून महत्त्वाचे निष्कर्ष काढणे.

एआय कुठे कमी पडते?

एआयमध्ये भावनिक बुद्धिमत्ता नाही. घबराट किंवा गोंधळाच्या परिस्थितीत ते तुमचे मार्गदर्शन करू शकत नाही. एआय लाईफ गोल्सनुसार तुम्हाला सल्ला देऊ शकत नाही. एआयच्या मोफत व्हर्जनमध्ये रिअल-टाईम मार्केट डेटाची कमतरता असते. त्यामुळे अडचण होते.

टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सगुंतवणूकपैसास्टॉक मार्केटशेअर बाजार