Join us

iPhone मेकर Apple भारतात घरे बांधणार; 'या' राज्यात उभारली जाणार 78000 घरे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 18:05 IST

Apple Awas Yojana: अॅपल कंपनी चीन आणि व्हिएतनामच्या धर्तीवर भारतात घरे बांधण्याची योजना आखत आहे.

Apple Housing Scheme: स्मार्टफोन मेकर Apple कंपनी महागडे आयफोन किंवा विविध उत्पादने बनवण्यासाटी ओळखली जाते. ॲपलने भारतातही आपला स्मार्टफोनचा प्लांट उभारला आहे. पण, आता अॅपलभारतात घरे बांधण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी भारतात सुमारे 78000 घरे बांधण्याची योजना आखत आहे. चीन आणि व्हिएतनामच्या धर्तीवर भारतात घरे बांधली जातील.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने आतापर्यंत भारतातील सुमारे 1.5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता कंपनी आपल्या याच कर्मचाऱ्यांना निवासी सुविधा देण्यासाठी घरे बांधण्याचा विचार करत आहे. ही घरे PPP म्हणजेच सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत बांधली जातील. या योजनेअंतर्गत 78000 घरांची निर्मिती केली जाईल.

सर्वाधिक फायदा तामिळनाडूला होणार या प्रकल्पातील बहुतांश घरे तामिळनाडूमध्ये बांधण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तेथे सुमारे 58000 घरे बांधण्यात येणार आहेत. सध्या टाटा समूह, तसेच एसपीआर इंडियादेखील घरे बांधत आहेत.

पीपीपी मॉडेल ही सर्वात मोठी योजना अॅपलचे उत्पादन अशा ठिकाणी होते, जिथे औद्योगिक गृहनिर्माण संकल्पना अस्तित्वात असते. याची तयारी सध्या भारतात सुरू आहे. पीपीपी मॉडेल अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांची व्याप्ती खूप विस्तृत असेल, असे सांगण्यात येत आहे. पीपीपी मॉडेलवरील ही भारतातील सर्वात मोठी गृहनिर्माण योजना मानली जात आहे.

खर्च कसा ठरवला जाईल?या योजनेबद्दल बोलायचे झाले तर या घरांच्या किमतीच्या 10 ते 15 टक्के रक्कम केंद्र सरकार देणार आहे. याशिवाय उर्वरित खर्च राज्य सरकार आणि कंपन्या उचलणार आहेत. याशिवाय त्याच्या बांधकामाचे कामही खासगी कंपनीकडे सोपवले जाऊ शकते. ॲपलचे हे पाऊल स्थलांतरित कामगारांना खूप मदत करेल आहे.

कामगारांमध्ये 75 टक्के महिलांचा समावेश फॉक्सकॉन भारतातील ॲपल आयफोनचा सर्वात मोठा पुरवठादार असून, त्यांना सुमारे 35,000 घरे देण्यात आली आहेत. कंपनीचा कारखाना तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे आहे. याशिवाय फॉक्सकॉनमध्ये सध्या सुमारे 41,000 कामगार काम करत आहेत, त्यापैकी 75 टक्के महिला आहेत.

 

टॅग्स :अॅपलस्मार्टफोनव्यवसायगुंतवणूकभारततामिळनाडू