Join us

इलॉन मस्कच्या रंजक कथा...; ऐकून तुम्हालाही वाटेल नवल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 10:14 IST

मस्क यांनी २००४ मध्ये टेस्ला या इलेक्ट्रिक कार निर्मात्या कंपनीची उभारणी केली. सद्य:स्थितीत टेस्ला ही जगातील क्रमांक एकची कंपनी आहे.

अख्खं ट्विटरच खरेदी केल्यानंतर इलॉन मस्क सध्या जबरदस्त चर्चेत आहेत. त्यांच्याविषयीच्या अनेक सुरस कथा आता प्रसृत होऊ लागल्या आहेत. त्यातील बहुतांश पूर्वीही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु त्या कथांना परत एक वलय निर्माण झाले आहे. आपण ही जाणून घेऊ या मस्क यांच्याविषयीच्या काही रंजक कथा...

मस्क यांच्याविषयी हे माहीत आहे का तुम्हाला?

२८ जून १९७१ : दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियामध्ये जन्मलेल्या मस्क यांनी वयाच्या १२व्या वर्षीच व्हिडीओ गेम तयार केला होता. १९९९  मस्क यांनी १ कोटी डॉलरची गुंतवणूक करत एक्स डॉट कॉम ही कंपनी सुरू केली. नंतर ती पेपाल नावाने नावारूपाला आली.२००२ ई-बेने १५० कोटी डॉलर मोजून पेपाल खरेदी केली. त्यात मस्क यांचा वाटा साडेसोळा कोटी डॉलरचा होता. ब्लास्टर गेम : ब्लास्टर हा स्पेस फायटिंगचा गेम त्यांनी एका मासिकाला ५०० डॉलरला विकून टाकला.मस्क यांनी बंधू किंबल याच्या साथीने झिप २ नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. नंतर ती दोन कोटी डॉलरला कॉम्पॅक कंपनीला विकून टाकली.मस्क यांनी २००४ मध्ये टेस्ला या इलेक्ट्रिक कार निर्मात्या कंपनीची उभारणी केली. सद्य:स्थितीत टेस्ला ही जगातील क्रमांक एकची कंपनी आहे.

ऐकावे ते नवलच२०१८ मध्ये मस्क यांनी टनेल बोअरिंग मशीन तयार केले.त्यासाठी द बोअरिंग ही कंपनीही नोंदणीकृत केली.या कंपनीने एक आग ओकणारे मशीन तयार केले. मस्क यांनी २० हजार यंत्रांची विक्रीही केली.मस्क यांना मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवायची आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली.

 

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटर