Join us

अदानीच्या शेअर्समध्ये तेजी, LIC ला मोठा फायदा; आठवडाभरात कंपनीला पुन्हा 'अच्छे दिन'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 14:59 IST

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने गेल्या 24 जानेवारीला एक रिपोर्ट जारी केला होता. यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सना जबरदस्त घसरणीचा सामना करावा लागला.

गौतम अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या दिवशीही तेजी दिसून आली. याच बरोबर, सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय जीवन विमा निगमने (LIC) समूहाच्या शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे झालेले नुकसानही भरून आले आहे. अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांपैकी सात कंपन्यांमध्ये LIC ने गुंतवणूक केली आहे. शेअर बाजाराकडून मिळाललेल्या माहितीनुसार, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमधील 1.28 टक्के एवढ्या वाट्यासह अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेडमध्ये LIC चा 9.14 टक्के वाटा आहे.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने गेल्या 24 जानेवारीला एक रिपोर्ट जारी केला होता. यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सना जबरदस्त घसरणीचा सामना करावा लागला. यामुळे आठवडाभरापूर्वी अदानी समूहातील एलआयसीचीगुंतवणूक नकारात्मक झाली होती. अदानी समूहात LIC ची एकूण गुंतवणूक 24 फेब्रुवारीला कमी होऊन 29,893.13 कोटी रुपयेच शिल्लक राहिली. तसेच, यांचे खरेदी मुल्य 30,127 कोटी रुपये होते.  आता अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. यानंतर अदानी समूहाची स्थिती बदलली आहे. शेअर बाजारच्या आकडेवारीनुसार, एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य शुक्रवारी (बंदभाव) 39,068.34 कोटी रुपये होते. अशा प्रकारे एलआयसीला 9,000 कोटी रुपयांचा फायदा होत आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे LIC च्या गुंतवणुकीसंदर्भातील निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले होते.

टॅग्स :एलआयसीअदानीगौतम अदानीगुंतवणूकशेअर बाजार