LPG Gas Supply : मध्य-पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाचे पडसाद आता भारताच्या गॅस पुरवठा साखळीवर उमटू लागले आहेत. 'अदानी टोटल गॅस लिमिटेड'ने आपल्या औद्योगिक ग्राहकांच्या गॅस पुरवठ्यात कपात झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने ९ मार्च २०२६ रोजी 'नॅचरल गॅस ऑर्डर, २०२६' जारी करून देशभरात गॅस वितरणाचे नवे प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत.
उद्योगांना 'गॅस'ची झळअदानी टोटल गॅसने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही प्रमुख पुरवठादारांनी गॅस पुरवठ्यात कपात केली आहे. याचा थेट फटका कंपनीच्या औद्योगिक ग्राहकांना बसला आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या एलएनजी शिपमेंटमध्ये अडथळे आल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे.
कोणाला मिळणार आधी गॅस?जीवनावश्यक सेवा विस्कळीत होऊ नयेत, यासाठी सरकारने गॅस वाटपाची नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार गॅसचा पुरवठा खालील क्रमाने केला जाईल.घरगुती : स्वयंपाकघरातील पाईप्ड नॅचरल गॅसला सर्वोच्च प्राधान्य.वाहतूक : सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीसाठी सीएनजीचा पुरवठा सुरळीत ठेवला जाईल.खत उत्पादन : देशाची अन्नसुरक्षा लक्षात घेता खत कारखान्यांना प्राधान्य.इतर अत्यावश्यक क्षेत्रे: औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी मर्यादित स्वरूपात पुरवठा.
वाचा - भारताचा ६० टक्के LPG पुरवठा धोक्यात; वाचा काय आहे सरकारची नवी रणनीती?
अदानी समूहाची भूमिकासरकारच्या या निर्णयाचे अदानी टोटल गॅसने स्वागत केले आहे. घरगुती ग्राहक आणि वाहतूक क्षेत्राला संरक्षण देणारा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या कंपनी या आदेशाच्या परिणामांचे आकलन करत असून, पुरवठ्यातील अडथळे कमी करण्यासाठी सरकारी यंत्रणांशी समन्वय साधत आहे.
Web Summary : Geopolitical tensions disrupt India's gas supply. Adani Total Gas cuts industrial supply after government's new gas distribution order prioritizing domestic, transport, and fertilizer sectors. The company welcomes the move and coordinates with authorities to minimize disruptions.
Web Summary : भू-राजनीतिक तनाव से भारत की गैस आपूर्ति बाधित। अदानी टोटल गैस ने घरेलू, परिवहन और उर्वरक क्षेत्रों को प्राथमिकता देने वाले सरकार के नए गैस वितरण आदेश के बाद औद्योगिक आपूर्ति में कटौती की। कंपनी ने कदम का स्वागत किया और व्यवधानों को कम करने के लिए अधिकारियों के साथ समन्वय कर रही है।