Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतात अदानी पुन्हा टाॅपर! शेअर्समधील तेजीचा फायदा, एकूण संपत्ती ९२.०६ अब्ज डाॅलर्सवर; इलाॅन मस्क जगात श्रीमंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 09:47 IST

Adani News:भारतीय कॉर्पोरेट जगतातील दोन दिग्गज उद्योगपतींमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत गौतम अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान पटकावला आहे.

नवी दिल्ली -  भारतीय कॉर्पोरेट जगतातील दोन दिग्गज उद्योगपतींमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत गौतम अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान पटकावला आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या तुफान तेजीमुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून, त्यांनी जागतिक श्रीमंतांच्या यादीतही मोठी झेप घेतली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता ९२.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. तर, मुकेश अंबानी यांची संपत्ती ९०.८ अब्ज डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली आहे. गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत १९व्या, तर मुकेश अंबानी २०व्या स्थानी आहेत. बंदरे, नवीकरणीय ऊर्जा आणि विमानतळ अशा विविध क्षेत्रांत विस्तारलेल्या अदानी साम्राज्यावर गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हा बदल पाहायला मिळत आहे.

हिंडेनबर्ग संकटानंतर गाैतम अदानींचा पुन्हा एकदा कमबॅक२०२२ मध्ये अदानी पहिल्यांदा पहिल्या क्रमांकावर पोहोचले होते. मात्र, हिंडेनबर्ग अहवालानंतर त्यांच्या संपत्तीत घट झाली होती. त्यानंतर त्यांनी अत्यंत संयमाने आणि धोरणात्मक निर्णयांनी आपल्या समूहाला सावरले. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Adani Tops Rich List Again! Wealth Soars to $92.06 Billion

Web Summary : Gautam Adani surpassed Mukesh Ambani as Asia's richest person. Adani's wealth reached $92.06 billion due to his company's stock surge. He is now 19th globally after recovering from the Hindenburg report fallout. Elon Musk remains the world’s richest.
टॅग्स :अदानीपैसा