Join us

Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 11:31 IST

Adani Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारांदरम्यान अदानी समूहाच्या शेअरमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून येत आहे. अ

Adani Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारांदरम्यान अदानी समूहाच्या शेअरमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून येत आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये (Adani Green Energy) सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली आहे. अदानी एंटरप्रायझेस ३.८९ टक्क्यांनी वधारून २४९१ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर अदानी पॉवरचा शेअर ८.६३ टक्क्यांनी वधारून ५६८.२० रुपयांवर व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात अदानी पोर्ट्स १.८३ टक्के, अदानी टोटल गॅस लिमिटेड ८.८५ टक्के, अदानी विल्मर २.६२ टक्क्यांनी वधारले.

अदानी एनर्जी सोल्यूशन्समध्येही १० टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर कंपनीचा शेअर ७२३.४५ रुपयांवर व्यवहार करत होता. सांघी इंडस्ट्रीजचा शेअर दीड टक्क्यांनी वधारून ८२.८९ रुपयांवर आला. तर एसीसी ०.८९ टक्के आणि अंबुजा सिमेंट ०.५५ टक्क्यांनी वधारला आहे. एनडीटीव्हीचा शेअर जवळपास २ टक्क्यांनी वधारला आहे.

रेटिंग एजन्सी मूडीजनं अदानींच्या सात कंपन्यांचा क्रेडिट आउटलूक 'स्थिर' वरून 'नकारात्मक' केला आहे. मुडीजनं यासाठी अध्यक्ष गौतम अदानी आणि इतरांवर कथितरित्या लाच दिल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचं कारण दिलं आहे. त्याचबरोबर फिच रेटिंग्जनं समूहातील काही बॉन्ड्स नकारात्मक देखरेखीखाली ठेवले आहेत.

वाढीचं कारण काय?

अदानी ग्रीननं गौतम अदानी, सागर अदानी यांची लाच प्रकरणात नावं नसल्याचा दावा केला आहे, त्यानंतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये ही तेजी दिसून आली. तर दुसरीकडे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीही अदानी आणि त्यांच्या पुतण्यावर ५ आरोपांपैकी एकातही आरोप करण्यात आलं नसल्याचं म्हटलंय. नंबर १ अदानी म्हणजेच गौतम अदानी आणि सागर अदानी या दोघांना सोडून काही अन्य लोकांच्या विरोधात आरोप करण्यात आलेत. केवळ अॅज्युर आणि सीडीपीक्यू अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजार