8th Pay commission: पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांची प्रमुख संघटना Federation of National Postal Organisations (FNPO) ने ८व्या वेतन आयोगासमोर महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. २० एप्रिल २०२६ रोजी सादर केलेल्या मेमोरँडममध्ये वेतनवाढ, भत्त्यांमध्ये सुधारणा, पदोन्नती आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधांची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा ८वा वेतन आयोग येत्या २८ ते ३० एप्रिल दरम्यान कर्मचारी संघटनांशी चर्चा करणार आहे.
एन्ट्री लेव्हल ते पोस्टमनपर्यंत वेतनवाढीची मागणी
FNPO ने सध्याच्या वेतन संरचनेत मोठे बदल सुचवले आहेत. एन्ट्री लेव्हल (Level 1): ₹१८,००० वरून ₹६९,०००, तर पोस्टमन/मेल गार्ड (Level 5): ₹२५,५०० वरून ₹१.१२ लाख करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, पोस्टल आणि सॉर्टिंग असिस्टंट, सुपरवायझर आणि इतर कॅडरसाठीही मोठ्या वेतनवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. वेतन संरचना सोपी करण्यासाठी काही पे-लेव्हल्स मर्ज करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.
फिटमेंट फॅक्टर आणि इन्क्रिमेंट वाढवण्याची मागणी
संघठनेने फिटमेंट फॅक्टर २.५७ वरून ३.८३ करण्याची मागणी आणि वार्षिक पगारवाढ ३% वरून ६% करण्याची मागणी केली आहे. FNPO च्या मते, सध्याचा ३% वाढ दर महागाई, आरोग्य खर्च आणि शिक्षणाच्या वाढत्या खर्चाच्या तुलनेत अपुरा आहे.
प्रमोशन, HRA आणि इतर भत्त्यांवर भर
संघटनेने खालील सुधारणा सुचवल्या आहेत
MACP योजनेत किमान ५ प्रमोशनHRA वाढ:X शहर: ४०%Y शहर: ३५%Z शहर: ३०%
HRA ला महागाई भत्त्याशी (DA) जोडून नियमित वाढ देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महिला कर्मचारी आणि आरोग्य सुविधा
महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष मागण्या
वर्षाला १२ मेंस्ट्रुअल लीव्हसुधारित चाइल्ड केअर लीव्ह (CCL)क्रेच सुविधाजेंडर-सेंसिटिव्ह पोस्टिंग
तसेच सर्व कर्मचारी आणि पेन्शनर्सना Central Government Health Scheme (CGHS) अंतर्गत कॅशलेस उपचार सुविधा देण्याची मागणी आहे.
पेन्शन आणि इतर सुधारणापेन्शन आणि फॅमिली पेन्शनचा खर्च थेट केंद्र सरकारकडून देण्याची मागणी, सर्व भत्त्यांचे पुनरावलोकन, सेव्हिंग बँक संबंधित कामांसाठी योग्य मोबदला आणि एक्स-सर्व्हिसमॅनसाठी समान वेतन निर्धारणची मागणी करण्यात आली आहे.
Web Summary : Postal employees' union demands significant pay hikes, allowances, and promotions in the 8th Pay Commission. Entry-level pay sought at ₹69,000 and postmen at ₹1.12 lakh. They request a higher fitment factor, increased increment, and improved facilities for women.
Web Summary : डाक कर्मचारियों के संघ ने 8वें वेतन आयोग में वेतन वृद्धि, भत्तों और पदोन्नति की मांग की है। एंट्री-लेवल वेतन ₹69,000 और पोस्टमैन का वेतन ₹1.12 लाख करने का अनुरोध किया गया है। उन्होंने उच्च फिटमेंट फैक्टर, बढ़े हुए वेतन वृद्धि और महिलाओं के लिए बेहतर सुविधाओं का अनुरोध किया।