Join us

भारतात तयार झालेले ७०% आयफोन निर्यात, प्रथमच मोठ्या संख्येने ग्राहक वस्तू केल्या एक्सपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 12:09 IST

ॲपलने वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये भारतातून १० अब्ज डॉलरचे आयफाेन निर्यात केले असून, हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे.

ॲपलने वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये भारतातून १० अब्ज डॉलरचे आयफाेन निर्यात केले असून, हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. सरकारला मिळालेल्या आकडेवारीनुसार, उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेंतर्गत वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये विकण्यात आलेल्या आयफोनची किंमत वित्त वर्ष २०२२-२३ मध्ये विकण्यात आलेल्या आयफोनच्या किमतीपेक्षा दुप्पट आहे. भारतातून प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने ग्राहक वस्तूंची निर्यात झाली आहे.  

गेल्या वित्त वर्षात भारतात उत्पादित करण्यात आलेल्या आयफोनपैकी ७० टक्के आयफोन निर्यात करण्यात आले. तीन कंपन्यांनी एकूण १४ अब्ज डॉलरचे आयफोन निर्माण केले. पीएलआय योजनेनुसार या तिन्ही कंपन्यांना ७.२ अब्ज डॉलरचे आयफोन निर्यात करायचे होते. तथापि, त्यांनी ३९ टक्के अधिक निर्यात केली. 

२०२४-२५ पर्यंत १० अब्ज डॉलरचे फोन निर्यात करण्याचे उद्दिष्ट ॲपलने ठेवले होते. तथापि, कंपनीने १ वर्ष आधीच हे उद्दिष्ट गाठले.  

सर्वाधिक निर्यात कुणाची? 

  • विस्ट्रॉन (टाटा)  ९७%
  • पेगाट्रॉनन          ७४%
  • फॉक्सकॉन        ६०%
टॅग्स :अॅपलभारत