Join us
Daily Top 2Weekly Top 5

२.८१ कोटी वाहनांची विक्री; सर्वाधिक कोणाला पसंती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 07:18 IST

वर्षभरात एकूण २ कोटी ८१ लाखांहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे.

नवी दिल्ली : भारतीय वाहन उद्योगासाठी २०२५ हे वर्ष अत्यंत फायदेशीर ठरले आहे. सरत्या वर्षात देशात वाहनांच्या एकूण किरकोळ विक्रीत ७.७१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून, वर्षभरात एकूण २ कोटी ८१ लाखांहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. वाहन डीलर्सची शिखर संघटना ‘फाडा’ने ही माहिती दिली आहे.

ईव्ही अन् सीएनजीचा बोलबाला : पर्यायी इंधनाकडे ग्राहकांचा ओढा वाढला असून इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) बाजार हिश्श्यात मोठी वाढ झाली आहे. तसेच, प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या विभागात सीएनजी (सीएनजी) गाड्यांची मागणीही अधिक मजबूत झाल्याचे ‘फाडा’ने नमूद केले आहे.

विक्री वाढीची प्रमुख ५ कारणे

- जीएसटी दरातील कपात - व्याजदरात घट - उत्तम मान्सून - ईव्ही क्रांती - सवलतींचा वर्षाव

वाहनाचा प्रकार२०२५ विक्रीवार्षिक वाढ (%)
एकूण वाहने२.८१ कोटी७.७१%
दुचाकी वाहने२.०२ कोटी७.२४%
प्रवासी वाहने४४.७५ लाख९.०७%
तीन चाकी वाहने१३.०९ लाख७.२१%
व्यावसायिक वाहने१०.०९ लाख६.७१%

 

English
हिंदी सारांश
Web Title : Vehicle Sales Surge: 2.81 Crore Units Sold; Preferences Revealed

Web Summary : India's vehicle market boomed in 2025, with sales rising 7.71% to 2.81 crore units. Electric and CNG vehicles gained popularity, fueled by GST cuts, lower interest rates, good monsoons, and attractive discounts across vehicle categories.
टॅग्स :वाहनवाहन उद्योगव्यवसाय