Join us

मोदी सरकारकडून PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना मदत - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 12:18 IST

Union Budget 2024 Live Updates :अर्थमंत्र्यांकडून देशातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Union Budget 2024 Live Updates : नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांकडून देशातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर दिला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते. आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना मोदी सरकारने मदत केल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. 

देशातील 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच, शेतीसाठी आधुनिक साठवण केली जाणार असून पुरवठा साखळीवर भर देण्यात येईल. याशिवाय, सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला आणखी प्रोत्साहन देणार आहे. तसेच, डेअरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरच योजना आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.

याचबरोबर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पात मच्छिमारांना सुद्धा मोठा दिलासा दिला आहे. मत्स्यपालन योजनेला चालना देण्यासाठी येत्या काळात काम केले जाईल. सागरी अन्न निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. देशात पाच एकात्मिक ॲक्वा पार्क स्थापन केली जातील, असेही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.   

टॅग्स :अर्थसंकल्प 2024निर्मला सीतारामनशेतकरीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाव्यवसाय