SEBI Life Cycle Funds : आपल्या भविष्यातील गरजा, जसे की मुलांचे शिक्षण, लग्न किंवा स्वतःची निवृत्ती, यासाठी गुंतवणूक करताना नेमका कोणता फंड निवडावा आणि पोर्टफोलिओ कधी बदलावा, या चिंतेतून आता गुंतवणूकदारांची मुक्तता होणार आहे. सेबीने ‘लाईफ सायकल फंड्स’ ही एक नवी कोरी श्रेणी सुरू केली आहे. हे फंड विशेषतः दीर्घकालीन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आले आहेत.
काय आहेत हे 'लाईफ सायकल फंड्स'?
हे ‘ओपन-एंडेड’ म्युच्युअल फंड आहेत, ज्यांची एक निश्चित मॅच्युरिटी तारीख असते. या फंडांच्या नावातच त्यांचे वर्ष असते, उदाहरणार्थ- ‘लाईफ सायकल फंड २०४५’ किंवा ‘२०५५’. जर तुम्हाला २०४५ मध्ये निवृत्ती घ्यायची असेल किंवा मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पैसे हवे असतील, तर तुम्ही त्या वर्षाचा फंड निवडू शकता. एका म्युच्युअल फंड कंपनीकडे असे जास्तीत जास्त ६ सक्रिय फंड असू शकतात.
वयानुसार जोखीम कमी होणार
या फंडांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘ग्लाइड पाथ’. हे नेमके कसे काम करते?जेव्हा तुमचे ध्येय २०-३० वर्षे दूर असते, तेव्हा हा फंड जास्तीत जास्त पैसा इक्विटी (शेअर बाजार) मध्ये गुंतवतो, जेणेकरून तुम्हाला मोठा परतावा मिळेल.जशी मॅच्युरिटीची तारीख जवळ येते, तसा हा फंड स्वतःहून शेअर्समधील गुंतवणूक कमी करून ती डेट (बॉन्ड्स), गोल्ड ईटीएफ, सिल्वर ईटीएफ सारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळवतो.यामुळे गुंतवणूकदाराला स्वतःहून पोर्टफोलिओचे संतुलन करण्याची गरज पडत नाही.
गुंतवणूकदारांसाठी असलेले फायदे
- ऑटोमॅटिक बॅलन्सिंग : बाजार पाहून खरेदी-विक्री करण्याची कसरत गुंतवणूकदाराला करावी लागत नाही.
- शिस्तबद्ध गुंतवणूक : हे फंड दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देतात.
- जोखीम व्यवस्थापन : निवृत्ती जवळ येताना तुमचे जमा झालेले भांडवल सुरक्षित राहते.
- विविधता : एकाच फंडातून शेअर्स, सोने आणि डेट अशा विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक होते.
गुंतवणुकीचे नियम आणि एक्झिट लोड
हे फंड कधीही खरेदी किंवा विक्री करता येतात, पण गुंतवणूकदारांनी पैसे लवकर काढू नयेत यासाठी सेबीने कडक ‘ग्रेडेड एक्झिट लोड’ लावला आहे:
१ वर्षाच्या आत पैसे काढल्यास : ३% दंड.२ वर्षांत पैसे काढल्यास : २% दंड.३ वर्षांत पैसे काढल्यास : १% दंड.
कोणासाठी आहेत हे फंड?
जे तरुण आपल्या निवृत्तीचे नियोजन करत आहेत किंवा ज्या पालकांना मुलांच्या भविष्यासाठी २०-२५ वर्षांचा कालावधी द्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे फंड सर्वोत्तम आहेत. मात्र, ज्यांना कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांनी या फंडांपासून दूर राहणेच हिताचे ठरेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : SEBI introduces Life Cycle Funds, open-ended schemes with maturity dates. These funds automatically shift investments from equity to safer options like bonds as you age, reducing risk and simplifying long-term financial planning for goals like retirement or education.
Web Summary : सेबी ने लाइफ साइकिल फंड्स शुरू किए हैं, जो एक निश्चित मैच्योरिटी वाले ओपन-एंडेड स्कीम हैं। ये फंड उम्र के साथ इक्विटी से बॉन्ड जैसे सुरक्षित विकल्पों में निवेश को स्वचालित रूप से बदलते हैं, जिससे रिटायरमेंट या शिक्षा जैसे दीर्घकालिक वित्तीय लक्ष्यों की योजना सरल हो जाती है।