Join us

फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:45 IST

SIP Investment Strategy : जर तुम्हाला पुढील १० किंवा १५ वर्षांत करोडपती व्हायचे असेल, तर तुम्हाला दरमहा किती पैसे गुंतवावे लागतील? चला एसआयपीचे गणित समजून घेऊ.

Investment Tips : कोट्यधीश होण्यासाठी खूप उत्पन्न असावे असं काही नाही. फक्त गुंतवणुकीची शिस्त आणि आर्थिक नियोजन पक्क हवं. म्युच्युअल फंडातील पद्धतशीर गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून लहान बचतीतूनही मोठी संपत्ती तयार करणे शक्य आहे. अट फक्त एकच आहे, ती म्हणजे तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागेल. अनेक गुंतवणूकदारांना प्रश्न पडतो की, १० किंवा १५ वर्षांमध्ये १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी कसा जमा करता येईल? चला आज याचं संपूर्ण गणित समजून घेऊ.

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, तुमच्या गुंतवणुकीवर जर सरासरी १२% परतावा मिळाला, तर तुम्हाला दरमहा नेमकी किती रक्कम एसआयपीमध्ये गुंतवावी लागेल, याचं साधं गणित खालीलप्रमाणे आहे.

SIP मध्ये चक्रवाढीचा फायदाएसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा मोठा लाभ मिळतो. तुमच्याकडे मोठी रक्कम नसली तरी, दरमहा छोटी रक्कम गुंतवून दीर्घकाळात तुम्ही मोठा निधी तयार करू शकता. तुमच्या उत्पन्नानुसार मोठी रक्कम गुंतवल्यास, कमी वेळात कोट्यवधी रुपयांचा निधी उभारणे शक्य होते.

१० वर्षांत १ कोटीचा निधी जमा करण्याचे गणितजर तुमचा गुंतवणुकीचा कालावधी फक्त १० वर्षांचा असेल आणि तुम्हाला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी जमा करायचा असेल, तर तुम्हाला दरमहा मोठी गुंतवणूक करावी लागेल.

उदाहरणार्थ :जर तुम्ही दर महिन्याला ४०,००० रुपये एसआयपीमध्ये गुंतवले, आणि त्यावर सरासरी १२% वार्षिक परतावा मिळाला, तर १० वर्षांनंतर तुमच्याकडे ९२ लाख रुपये रुपयांहून अधिक निधी जमा होऊ शकतो.याचा अर्थ, १० वर्षांत १ कोटीचा टप्पा गाठण्यासाठी तुम्हाला दरमहा ४५,००० रुपयांच्या आसपास गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल.१० वर्षांमध्ये १ कोटीचा निधी जमा करण्यासाठी तुम्हाला मासिक गुंतवणूक जवळपास ४०,००० ते ४५,००० रुपये करावी लागेल.

१५ वर्षांत १ कोटीचा निधी जमा करण्यासाठी गुंतवणूकगुंतवणुकीचा कालावधी वाढवल्यास, चक्रवाढ व्याजाचा परिणाम अधिक शक्तिशाली होतो. त्यामुळे तुम्ही कमी रक्कम गुंतवूनही मोठा निधी तयार करू शकता.

उदाहरणार्थ :जर तुम्ही दर महिन्याला फक्त २०,००० रुपये एसआयपीमध्ये गुंतवले आणि त्यावर सरासरी १२% दराने परतावा मिळाला, तर १५ वर्षांनंतर तुमच्याकडे १,००,९१,५२० रुपयांहून अधिक निधी जमा होईल.तुम्ही गुंतवणूक करण्याची क्षमता २०,००० रुपये प्रति महिना इतकी ठेवली आणि कालावधी १५ वर्षांपर्यंत वाढवला, तरीही तुम्ही १ कोटी रुपयांचे लक्ष्य सहज गाठू शकता.

वाचा - इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

वेळेचे महत्त्वया उदाहरणांवरून स्पष्ट होते की, तुम्हाला १० वर्षांत १ कोटी रुपये हवे असल्यास, ४०,००० रुपयांहून अधिक गुंतवणूक करावी लागेल, तर १५ वर्षांसाठी केवळ २०,००० पुरेसे आहेत.गुंतवणुकीच्या जगात 'जितक्या लवकर गुंतवणूक, तितका जास्त फायदा' हाच नियम लागू होतो. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एसआयपीची सुरुवात लवकरात लवकर करणे नेहमीच फायदेशीर ठरते.

English
हिंदी सारांश
Web Title : Create ₹1 Crore in 10 Years: SIP Investment Guide

Web Summary : Achieve ₹1 crore in 10 years through SIP investments. Invest ₹40,000-₹45,000 monthly, or ₹20,000 for 15 years, assuming 12% returns. Early investment maximizes returns.
टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारस्टॉक मार्केटपैसा