SIP for beginners : "रिस्क है तो इश्क है" असा डायलॉग स्कॅम १९९२ द हर्षद मेहता या वेब सिरीजमध्ये तुम्ही ऐकला असेल. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे धोका पत्कारणेच आहे. अनेकजण हा धोका पत्करुन कोट्यधीश झाले आहेत. मात्र, जोखीम घेण्याची प्रत्येकाची ऐपत असेलच असे नाही. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंड योजना धावून येतात. जर तुम्ही अजून गुंतवणुकीला सुरुवात केली नसेल आणि आता गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय शोधत असाल, तर SIP तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक पर्याय असू शकतो. आजच्या तरुण पिढीमध्ये SIP खूप लोकप्रिय होत आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी हे उत्तम साधन मानले जाते. पण, तुम्ही जर नवीन गुंतवणूकदार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
एसआयपी हा गुंतवणुकीचा उत्तम आणि शिस्तबद्ध मार्ग एसआयपी म्हणजेच सिस्टेमॅटीक इनवेस्टमेंट प्लॅन, ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक अतिशय उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. SIP मध्ये दर महिन्याला ठराविक तारखेला निश्चित रक्कम गुंतवली जाते. मोठ्या एकरकमी गुंतवणुकीच्या विपरीत, एसआयपी तुम्हाला दरमहा थोड्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची संधी देते, ज्यामुळे तुम्हाला दीर्घ कालावधीत मोठा निधी तयार करता येतो. एसआयपी ही म्युच्युअल फंडाची एक शाखा आहे, त्यामुळे शेअर बाजारातून आकर्षक परताव्यासह, चक्रवाढीचा जबरदस्त फायदाही मिळतो.
दीर्घकाळात प्रचंड फायदेएसआयपीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रुपयाची सरासरी किंमत. एसआयपीमध्ये तुम्ही एक निश्चित रक्कम गुंतवता. यामध्ये बाजार असताना अधिक युनिट्स आणि बाजार वाढत असताना कमी युनिट्स खरेदी करता. कालांतराने प्रत्येक युनिटची सरासरी किंमत ही वाढीवच असते. यामुळे तुमचा दीर्घकालीन परतावा वाढतो. यासोबतच SIP च्या मदतीने तुम्हाला बचत करण्याची सवय लागेल.
एसआयपी योजनेत प्रचंड लवचिकतातुम्हाला पाहिजे तेव्हा एसआयपी बदलता येईल. जर तुमच्याकडे एका महिन्यात जास्त बचत असेल तर तुम्ही तुमची रक्कम वाढवून गुंतवणूक करू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही रक्कम कमी करून गुंतवणूक करू शकता. तुम्हाला कोणत्याही महिन्यात पैशांची गरज असल्यास, तुम्ही तुमचा SIP हप्ता स्किप करू शकता. एसआयपी कधीही रद्द केली जाऊ शकते आणि पैसे काढण्याचा पर्याय देखील आहे. दीर्घकाळात, एसआयपीमुळे तुम्हाला बाजारातील अत्यंत चढ-उतारांच्या गंभीर परिणामांचा परिणाम होत नाही.
नवीन गुंतवणूकदारांनी एसआयपी योजना निवडताना काळजी घ्यायला. यामध्ये एक्सपेन्स रेशो, एक्झिट लोड, भागभांडवल, परतावा या सर्व गोष्टींचा अभ्यास करुनच निर्णय घ्यायला हवा. यासाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. आकर्षक जाहिरातींना बळी पडून कुठेही गुंतवणूक करू नका.