Top 5 Midcap Funds : जेव्हा पैसे गुंतवणुकीचा विचार मनात येतो, तेव्हा अनेकजण पोस्ट ऑफिस किंवा बँकेत एफडी करण्याचा विचार करतात. मात्र, एफडीमध्ये पैसे दुप्पट होण्यासाठी साधारणपणे ९-१० वर्षे लागतात. अशा परिस्थितीत, इक्विटी म्युच्युअल फंड कमी वेळेत जास्त परतावा देण्यासाठी चांगा पर्याय आहे. लार्ज कॅप फंड्सच्या तुलनेत मिड कॅप फंड्स जास्त आकर्षक परतावा देतात आणि स्मॉल कॅप फंड्सच्या तुलनेत त्यांची जोखीम कमी असते.
गेल्या ३ वर्षांमध्ये, अनेक मिड कॅप फंड्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट किंवा त्याहून अधिक केले आहेत. येथे अशाच ५ फंड्सबद्दलची माहिती दिली आहे, ज्यांनी जबरदस्त परतावा दिला आहे.
१. इनवेस्को इंडिया मिड कॅप फंड - डायरेक्ट प्लान
- ३ वर्षांचा परतावा (CAGR) : २९.३१%
- १ लाख रुपयांचे मूल्य (३ वर्षांत): २,१६,३४८ रुपये
- SIP वर ३ वर्षांचा परतावा: ३१.३८%
- एक्सपेंस रेशियो: ०.५५%
- रेटिंग : व्हॅल्यू रिसर्च ४ स्टार, क्रिसिल ५ स्टार
२. मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड - डायरेक्ट प्लान
- ३ वर्षांचा परतावा (CAGR) : २९.१२%
- १ लाख रुपयांचे मूल्य (३ वर्षांत): २,१५,४०८ रुपये
- SIP वर ३ वर्षांचा परतावा : २७.७%
- एक्सपेंस रेशियो : ६९%
- रेटिंग: व्हॅल्यू रिसर्च ५ स्टार, क्रिसिल ५ स्टार
३. एचडीएफसी मिड कॅप फंड - डायरेक्ट प्लान
- ३ वर्षांचा परतावा (CAGR) : २६.३५%
- १ लाख रुपयांचे मूल्य (३ वर्षांत): २,०१,८५४ रुपये
- SIP वर ३ वर्षांचा परतावा : २३.९१%
- एक्सपेंस रेशियो : ०.७५%
- रेटिंग : व्हॅल्यू रिसर्च ५ स्टार, क्रिसिल ४ स्टार
४. एडलवाईज मिड कॅप फंड - डायरेक्ट प्लान
- ३ वर्षांचा परतावा (CAGR) : २६%
- १ लाख रुपयांचे मूल्य (३ वर्षांत): २,००,१६० रुपये
- SIP वर ३ वर्षांचा परतावा : २६.७२%
- एक्सपेंस रेशियो: ०.३९%
- रेटिंग : व्हॅल्यू रिसर्च ५ स्टार, क्रिसिल ५ स्टार
५. निप्पॉन इंडिया ग्रोथ मिड कॅप फंड - डायरेक्ट प्लान
- ३ वर्षांचा परतावा (CAGR) : २५.५४%
- १ लाख रुपयांचे मूल्य (३ वर्षांत): १,९७,९५८ रुपये
- SIP वर ३ वर्षांचा परतावा : २४.९२%
- एक्सपेंस रेशियो: ०.७१%
- रेटिंग : व्हॅल्यू रिसर्च ४ स्टार, क्रिसिल ३ स्टार
मिड कॅप फंड्समध्ये एवढा जास्त परतावा का मिळतो?मिड कॅप फंड्स अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, ज्या शेअर बाजारात मार्केट कॅपच्या दृष्टीने १०१ ते २५० क्रमांकावर आहेत. या कंपन्या मोठ्या होण्याच्या (लार्ज कॅप बनण्याच्या) स्थितीत असतात, ज्यामुळे त्यांची वाढ वेगाने होते. हीच वाढ फंड्सना जास्त परतावा मिळवून देते.
वाचा - HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)