Join us
Daily Top 2Weekly Top 5

घर घेण्याचा विचार करताय? HDFC बँकेकडून ग्राहकांना दिलासा, एमसीएलआर दरात कपात; कर्ज स्वस्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:10 IST

HDFC MCLR Loan Rates: एचडीएफसी बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देत एमसीएलआर (MCLR) म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये कपात केली आहे.

HDFC MCLR Loan Rates: एचडीएफसी बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देत एमसीएलआर (MCLR) म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये कपात केली आहे. बँकेनं निवडक कालावधीसाठी एमसीएलआर ५ बेसिस पॉइंट्सनं कमी केलाय. विशेष बाब म्हणजे, केवळ तीन वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या एमसीएलआरमध्ये ५ बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.०५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. 

आता तीन वर्षांचा एमसीएलआर ८.६० टक्के झाला असून तो पूर्वी ८.६५ टक्के होता. इतर सर्व कालावधीसाठीच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ओव्हरनाईट आणि एका महिन्याचा एमसीएलआर ८.२५ टक्क्यांवर कायम आहे, तर तीन महिन्यांचा ८.३० टक्के, सहा महिने आणि एक वर्षाचा ८.४० टक्के आणि दोन वर्षांचा एमसीएलआर ८.५० टक्क्यांवर स्थिर आहे.

एमसीएलआरचे नवीन दर कधीपासून लागू झाले?

हे नवीन दर ७ फेब्रुवारी २०२६ पासून लागू झाले आहेत. बँकेनं आपल्या फंडिंग कॉस्ट आणि लिक्विडिटीच्या स्थितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) नुकत्याच झालेल्या पतधोरणात रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता, परंतु बँक आपल्या स्तरावर व्याजाचे दर संतुलित करण्यासाठी त्यात बदल करत आहे, जेणेकरून डिपॉझिट कॉस्ट आणि लेंडिंगमध्ये समतोल राखता येईल. या कपातीचा फायदा त्या लोकांना होईल ज्यांचं होम लोन, पर्सनल लोन किंवा बिझनेस लोन एमसीएलआरशी जोडलेले आहेत, विशेषतः ज्यांचे कर्ज तीन वर्षांच्या कालावधीशी लिंक आहे.

ग्राहकांना मिळणार थेट फायदा

एमसीएलआर कमी झाल्यामुळे कर्जाचा व्याजदर थोडा कमी होऊ शकतो, ज्यामुळे ईएमआयमध्ये किरकोळ घट होण्याची शक्यता आहे. ही कपात केवळ ५ बेसिस पॉइंट्सची असल्याने ती खूप मोठी नसली तरी, दीर्घकालीन कर्जाच्या बाबतीत ही बचत एकत्रितपणे मोठी रक्कम ठरू शकते. ईएमआयवर होणारा हा परिणाम तुमच्या कर्जाच्या 'रीसेट सायकल'वर अवलंबून असेल, म्हणजेच पुढील रीसेट तारखेला हा बदल लागू झालेला दिसेल. 

कर्जदारांसाठी सकारात्मक पाऊल

गेल्या काही महिन्यांत अनेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी देखील आपल्या एमसीएलआर दरांमध्ये बदल केले आहेत. कर्ज घेणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे, कारण कर्ज स्वस्त झाल्यामुळे घर खरेदी करणं किंवा व्यवसाय वाढवणं थोडं सोपं होतं. मात्र, हे लक्षात ठेवावं की केवळ एमसीएलआरशी जोडलेल्या कर्जाच्या ग्राहकांनाच याचा फायदा मिळेल आणि फ्लोटिंग रेट असलेल्या कर्जावरच याचा परिणाम होईल.

जर तुमचं कर्ज फिक्स्ड रेटचे असेल तर त्यात कोणताही बदल होणार नाही. बँकेनं उचललेलं हे छोटं पण सकारात्मक पाऊल ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल. तरीही, गुंतवणूक किंवा कर्जाशी संबंधित निर्णय घेण्यापूर्वी सर्व माहिती तपासून घ्यावी आणि बँकेकडून खात्री करून घ्यावी.

English
हिंदी सारांश
Web Title : HDFC Cuts MCLR: Home Loans to Get Cheaper, Relief for Borrowers

Web Summary : HDFC Bank reduces MCLR by 5 bps on select tenors, effective February 7, 2026. This cut lowers EMIs for MCLR-linked loans, especially three-year tenures. Borrowers with home, personal, or business loans benefit from this rate revision.
टॅग्स :एचडीएफसीपैसा