Join us

आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 18:28 IST

PM Vidya Lakshmi Yojana: केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षणासाठी कर्ज मिळू शकते.

PM Vidya Lakshmi Yojana: चांगले शिक्षण मिळावे, चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागावा, हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. पण, बऱ्याचदा पैशांच्या कमतरतेमुळे अनेकांना दर्जेदार आणि इच्छित ठिकाणी शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी पोर्टल. हे पोर्टल विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळविण्यास मदत करते. 

तुम्हाला शिक्षणासाठी कर्ज हवे असेल, तर कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी पोर्टल ही समस्या दूर करते. या पोर्टलद्वारे तुम्ही कुठेही न जाता घरी बसून अनेक बँकांच्या शैक्षणिक कर्ज योजनांची माहिती मिळवू शकता. हे पोर्टल केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. आतापर्यंत 38 बँका या पोर्टलशी जोडल्या गेल्या आहेत, ज्या एकूण 86 प्रकारचे शैक्षणिक कर्ज देतात.

कोण अर्ज करू शकते आणि नियम काय आहेत?तुम्ही भारतीय नागरिक असाल, बारावी उत्तीर्ण असाल आणि मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेत प्रवेश घेतला असेल, तर तुम्ही या पोर्टलद्वारे शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकता. pmvidyalaxmi.co.in या अधिकृत वेबसाइटवर देशातील टॉप ८६० सर्वोत्तम महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवणारे गुणवंत विद्यार्थी कोणत्याही हमीशिवाय शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकतात.

व्याजातही सूट ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांच्या कर्जावरील संपूर्ण व्याज सरकार भरते. दुसरीकडे, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाख ते ८ लाख रुपयांच्या दरम्यान आहे, त्यांना व्याजात ३% सूट मिळते. तुम्ही ७.५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले, तर त्यावर ७५% क्रेडिट गॅरंटीदेखील उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कर्ज घेण्यासाठी कोणतीही मालमत्ता नाही, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

अर्ज कसा करावा?pmvidyalaxmi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.नोंदणी लिंकवर क्लिक करा.नाव, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर टाकून नोंदणी करा.तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर एक लिंक येईल.क्लिक करून तुमचे खाते सुरू करा.आता तुमच्या युजरनेम आणि पासवर्डने लॉगिन करा.कॉमन एज्युकेशन लोन अॅप्लिकेशन फॉर्म (CELAF) भरा.तुम्ही एकाच वेळी तीन बँकांमध्ये अर्ज करू शकता.आता कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.

कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?

पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र असे इतर कोणतेही ओळखपत्र. तहसीलदाराने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र. जर तुम्ही राखीव वर्गातील असाल, तर जातीचा दाखला. निवास प्रमाणपत्र, मागील वर्गाची गुणपत्रिका आणि अभ्यासाशी संबंधित इतर कागदपत्रे. कॉलेज प्रवेश पत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, रद्द केलेल्या चेक/पासबुकची प्रत, कॉलेज फी पावती किंवा संपूर्ण तपशील. तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील असाल तर EWS प्रमाणपत्र लागेल. अशाप्रकारे तुम्ही लवकर कर्ज मिळवू शकता.

टॅग्स :शिक्षणबँकबँकिंग क्षेत्रविद्यार्थीकेंद्र सरकार