Join us
Daily Top 2Weekly Top 5

होम लोनच्या जाळ्यातून १० वर्षांतच व्हा मुक्त! २५ वर्षांचा हप्ता अर्ध्या वेळेत संपवण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 10:57 IST

Home Loan : दीर्घ मुदतीसाठी गृहकर्ज घेणे ही चांगली कल्पना नाही, कारण त्यामुळे व्याजापोटी तुम्हाला जास्त पैसे भरावे लागतात. पण, काही स्मार्ट टीप्स वापरुन तुम्ही फक्त १० वर्षांत २५ वर्षांचे कर्ज फेडू करू शकता.

Home Loan : स्वतःचे हक्काचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेले २५-३० वर्षांचे होम लोन अनेकदा मानसिक आणि आर्थिक ओझे बनू लागते. निवृत्तीपर्यंत ईएमआय भरत राहिल्याने बचतीवर मर्यादा येतात. पण तुम्हाला माहित आहे का? योग्य आर्थिक शिस्त आणि 'प्री-पेमेंट'च्या काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्यास तुम्ही ५० लाखांचे कर्ज अवघ्या १० वर्षांत फेडू शकता.

होम लोनचे गणित : व्याज की मुद्दल?लोन फेडण्यापूर्वी त्यामागचे गणित समजून घेणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या वर्षांत तुम्ही जो ईएमआय भरता, त्यातील मोठा हिस्सा हा व्याजात जातो, मुद्दलात नाही. समजा तुम्ही ८.५% दराने ५० लाख रुपयांचे कर्ज २५ वर्षांसाठी घेतले आहे. तुमचा मासिक हप्ता सुमारे ४०,३०० रुपये असेल. पहिल्या वर्षी तुम्ही एकूण ४.८३ लाख रुपये बँकला द्याल, पण धक्कादायक बाब म्हणजे यातील केवळ ६०,००० रुपये मुद्दलातून कमी होतील; उरलेले ४.२३ लाख रुपये केवळ व्याज असेल. त्यामुळे कर्ज लवकर संपवण्यासाठी सुरुवातीची ५-७ वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात.

१. वर्षाला एक 'एक्स्ट्रा ईएमआय' भराहा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. वर्षाच्या १२ महिन्यांत १२ ऐवजी १३ हप्ते भरण्याचे नियोजन करा. वर्षातून एकदा तुमच्या हप्त्याइतकी (उदा. ४०,००० रुपये) अतिरिक्त रक्कम भरल्यास ती थेट तुमच्या मुदलातून वजा होते. केवळ या एका स्टेपमुळे तुमचे २५ वर्षांचे कर्ज सुमारे २० वर्षांवर येते. तुमचा बोनस किंवा पगारवाढ यासाठी वापरता येईल.

२. 'स्टेप-अप' ईएमआयची जादूदरवर्षी नोकरीत पगारवाढ मिळते. याच प्रमाणात तुमचा ईएमआय देखील वाढवा.जर तुम्ही दरवर्षी तुमच्या हप्त्यात केवळ ७.५% ते १०% वाढ केली, तर मोठा फरक पडतो.पहिल्या वर्षी ४०,०००, दुसऱ्या वर्षी ४३,००० आणि तिसऱ्या वर्षी सुमारे ४६,००० याप्रमाणे हप्ता वाढवत गेल्यास, तुमचे २५ वर्षांचे कर्ज थेट १२ वर्षांच्या आसपास येते. म्हणजे अर्ध्याहून कमी वेळेत तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता.

वाचा - भारत-फ्रान्स टॅक्स करार! गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; शेअर विक्री आणि लाभांशावरील 'टॅक्स'चे नियम बदलले

३. 'पॉवर कॉम्बो' : १० वर्षांत व्हा ऋणमुक्त!जर तुम्हाला १० वर्षांच्या आत घर कर्जमुक्त करायचे असेल, तर वरील दोन्ही पद्धती एकत्र वापरा. दरवर्षी एक अतिरिक्त ईएमआय भरणे आणि दरवर्षी हप्त्यात १०% वाढ करणे. ५० लाखांच्या कर्जावर २५ वर्षांत तुम्ही सुमारे ७१ लाख रुपये केवळ व्याज भरता. पण या 'पॉवर कॉम्बो'मुळे तुम्ही १० वर्षांत मोकळे व्हालच, शिवाय व्याजापोटी जाणारे सुमारे ३५ ते ४० लाख रुपये वाचवाल. ही रक्कम तुमच्या निवृत्तीसाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मोठा निधी ठरू शकते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pay off your home loan in 10 years: Simple tips.

Web Summary : Repay home loan faster using pre-payment strategies. Pay one extra EMI annually or increase EMI amount to become debt-free quickly and save interest.
टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकबांधकाम उद्योगसुंदर गृहनियोजन