Join us

Whatsapp च्या ५० कोटी युजर्ससाठी नवीन वर्षात गुड न्यूज; सहजरित्या करू शकाल पेमेंट, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:14 IST

Whatsapp Payment News: यापूर्वी एनपीसीआयनं व्हॉट्सअ‍ॅप पेला टप्प्याटप्प्याने यूपीआय युझर बेस वाढवण्याची परवानगी दिली होती. यापूर्वी ही मर्यादा १० कोटी युजर्सपर्यंत होती.

Whatsapp Payment News : Whatsapp वापरणाऱ्या लाखो युजर्ससाठी खुशखबर आहे. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) व्हॉट्सअ‍ॅप पेवरील यूपीआय युजर्सची मर्यादा तात्काळ काढून टाकली आहे. एनपीसीआयनं यासंदर्भात एक निवेदन जारी केलंय. ही मर्यादा हटवल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप पे आता भारतातील आपल्या सर्व युजर्ससाठी यूपीआय सेवा वाढवू शकते, असं म्हटलंय

यापूर्वी एनपीसीआयनं व्हॉट्सअ‍ॅप पेला टप्प्याटप्प्याने यूपीआय युझर बेस वाढवण्याची परवानगी दिली होती. यापूर्वी ही मर्यादा १० कोटी युजर्सपर्यंत होती, जी एनपीसीआयनं आता काढून टाकली आहे.

या अधिसूचनेसह एनपीसीआयनं व्हॉट्सअ‍ॅप पेमध्ये युजर्स जोडण्याच्या मर्यादेवरील निर्बंध उठवले आहेत. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप पे या वेळी थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्ससाठी लागू असलेल्या सर्व यूपीआय मार्गदर्शक तत्त्वं आणि परिपत्रकांचं पालन करत राहील. एनपीसीआय भारतातील युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) संरचनेवर नियंत्रण ठेवते. देशातील रिटेल पेमेंट्स अँड सेटलमेंट सिस्टिमच्या (IBA) कामकाजाचं हे मूळ युनिट आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे ५० कोटींहून अधिक युजर्स आहेत.

WhatsApp Pay कसं वापराल?

यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचं लेटेस्ट व्हर्जन असणं आवश्यक आहे. व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि पेमेंट सेक्शनमध्ये जा. अ‍ॅड पेमेंट मेथड पर्याय निवडा. आपली बँक निवडा आणि त्याच्याशी संबंधित फोन नंबर एन्टर करा. व्हॉट्सअ‍ॅपला एसएमएस पाठवण्याची आणि रिसीव्ह करण्याची परवानगी द्या. यानंतर तुमचं अकाऊंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी यूपीआय पिन टाका. एकदा तुमचं अकाऊंट व्हेरिफाइड झालं की, तुम्ही कोणालाही पैसे पाठवू शकता.

टॅग्स :व्हॉट्सअ‍ॅपपैसा