BHIM Full Delegation Feature : भीम पेमेंट ॲपने आपल्या युजर्ससाठी एक अत्यंत उपयुक्त नवीन फीचर सुरू केले आहे, ज्याचे नाव 'फुल डेलिगेशन फीचर' आहे. भीम ॲपच्या या नवीन फीचरमुळे ज्येष्ठ नागरिक आणि कॉलेजमध्ये जाणारे तरुण किंवा लहान मुलांना मोठा फायदा होणार आहे. या नवीन सुविधेअंतर्गत, आता प्रायमरी युजर्ससोबतच सेकंडरी युजर्स देखील यूपीआय पेमेंट करू शकतील. सेकंडरी युजर्सची निवड प्रायमरी युजर्सद्वारेच केली जाईल.
भीमचे नवीन 'फुल डेलिगेशन फीचर' काय आहे?फुल डेलिगेशन फीचरमुळे प्रायमरी युजर्स आता त्यांच्यासोबत सेकंडरी युजर्सना जोडू शकतात, ज्यामुळे ते सेकंडरी युजर्स देखील पेमेंट करू शकतील. या फीचरद्वारे सेकंडरी युजर्स दरमहा १५,००० रुपयेपर्यंतचे ऑनलाइन पेमेंट करू शकतात. प्रायमरी युजर्स सेकंडरी युजर्ससाठी खर्चाची मर्यादा स्वतः सेट करू शकतात. अशा प्रकारे, पेमेंटवर पूर्ण नियंत्रण प्रायमरी युजर्सकडे राहील. डेलिगेशनचा कालावधी १ महिना ते ५ वर्षांपर्यंत असू शकतो.
कोणाला आणि कसा मिळेल लाभ?ज्या व्यक्तींचे स्वतःचे बँक खाते नाही किंवा यूपीआय आयडी नाही, त्यांनाही या फीचरचा लाभ मिळेल. ज्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःहून डिजिटल पेमेंट करणे कठीण वाटते, त्यांचे पेमेंट आता त्यांचे विश्वासू सेकंडरी युजर्स करू शकतील. पालक आपल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांच्या खर्चावर लक्ष ठेवू शकतील आणि त्यांना ठराविक खर्चाची मर्यादा सेट करून देऊ शकतील.
BHIM ॲपमध्ये UPI Circle कसे वापरावे?
- BHIM Payments App उघडा आणि होम स्क्रीनवर UPI Circle सेक्शनमध्ये जा.
- 'Invite to Circle' ऑप्शनवर क्लिक करून सेकंडरी युजरचा मोबाईल नंबर टाका.
- सेकंडरी युजरचा UPI ID टाका किंवा QR कोड स्कॅन करा.
- 'Approve a Monthly Limit (Full Delegation)' या पर्यायावर क्लिक करा आणि सेकंडरी युजरशी असलेले तुमचे नाते (उदा. मुल, पत्नी इ.) निवडा.
- सेकंडरी युजरच्या ओळखीसाठी काही आवश्यक दस्तऐवज सबमिट करा.
- सेकंडरी युजरसाठी मासिक मर्यादा (उदा. ₹५,०००) आणि डेलिगेशनचा कालावधी सेट करा.
- आपले बँक खाते निवडून UPI PIN टाकून डेलिगेशनला मंजुरी द्या.
- सेकंडरी युजरने रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर थोड्याच वेळात हे फीचर चालू होईल.
वाचा - आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त 'ही' कागदपत्रे आवश्यक, UIDAI चा मोठा बदल
Web Summary : BHIM app launches 'Full Delegation Feature,' benefiting seniors and students. Secondary users, chosen by primary users, can now make UPI payments up to ₹15,000 monthly, with customizable spending limits and delegation periods managed by the primary user. This assists those without accounts or UPI IDs.
Web Summary : भीम ऐप ने 'फुल डेलीगेशन फीचर' लॉन्च किया, जिससे वरिष्ठ नागरिकों और छात्रों को लाभ होगा। प्राथमिक उपयोगकर्ताओं द्वारा चुने गए द्वितीयक उपयोगकर्ता अब प्राथमिक उपयोगकर्ता द्वारा प्रबंधित अनुकूलन योग्य खर्च सीमा और प्रत्यायोजन अवधि के साथ, प्रति माह ₹15,000 तक का UPI भुगतान कर सकते हैं। यह उन लोगों की सहायता करता है जिनके पास खाते या UPI ID नहीं हैं।