Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडी वाढली, पुढील पाच दिवस कसं असेल हवामान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 20:31 IST

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीची लाट आली असून सगळीकडे थंडी जाणवू लागली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीची लाट आली असून सगळीकडे थंडी जाणवू लागली आहे. त्यानुसार आजपासून म्हणजेच 17 ते 21 जानेवारी पर्यंतच्या पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान हे 12 डिग्री से.ग्रेड (सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक) तर दुपारचे कमाल तापमान 28-30 डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी पेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक) दरम्यानचे असु शकते, असे वाटते. खान्देशसह उत्तर महाराष्ट्रातील शहरांत पहाटेचे हे किमान तापमान एकांकी संख्येवर आले असल्याची माहिती जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 

जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नसुन रब्बी हंगामातील भरड धान्य शेतपिके व इतर भाजीपाला पिके पाण्यावर आली असतील तर सिंचन करण्यास हरकत नाही. या कालावधीत ही रब्बी पिके फलधारणेच्या म्हणजे दाणाभरण्याच्या अवस्थेत तर काही हुरडा अवस्थेत आहेत. म्हणून तर ह्या कालावधीत पीकांच्या मुळान्न वाढीसाठी जमिनीखाली मोकळी हवा व जमिनीच्या वर पिकांना निरभ्र आकाशातून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून अन्नद्रव्यासाठी मकर संक्रांतीदरम्यान स्वच्छ सूर्यप्रकाश हवा असतो. म्हणून इतर प्रणालीतून वातावरणीय अडथळाविना नेहमी असतो, तसा स्वच्छ थंडीचा काळ शेतीसाठी महत्वाचा मानला जातो, व तो सूर्यप्रकाश सध्या मिळतो आहे.. 

सध्या महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे व दुपारचे, असे दोन्हीही  किमान व कमाल तापमान हे अजुनही दरवर्षी या कालावधीत जशी असावी तशी त्यांच्या सरासरी तापमानाच्या पातळीत नसून ती अधिकच आहे. आणि खरं तर थंडी चाचपण्याच्या नादात चालु कालावधी हा ' एल- निनोचा ' आहे. त्यानुसार जागतिक पातळीवरील सध्य: वातावरणीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जी थंडी असावी तशी आहे. आणि थंडीच्या चर्चेला वाव उपलब्ध होतो आहे, हेच खुप आहे, हे ही ध्यानात घ्यावे, असे वाटते. त्यातही, आता, आज व उद्या म्हणजे बुधवार-गुरुवारी (17-18 जानेवारी) ला विदर्भातील गोंदिया अन गडचिरोली 2 जिल्ह्यात तर पुन्हा काहीसे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून तेथील थंडी 2 दिवसाकरिताच घालवली जाईल, खुळे यांनी सांगितले आहे. 

 पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :हवामानमहाराष्ट्रशेती