lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > हवामान मॉडेल म्हणजे काय? तुमच्या भागातल्या हवमानाचा अंदाज यावरून काढला जातो...

हवामान मॉडेल म्हणजे काय? तुमच्या भागातल्या हवमानाचा अंदाज यावरून काढला जातो...

What is a weather model? The weather forecast for your area is derived from… | हवामान मॉडेल म्हणजे काय? तुमच्या भागातल्या हवमानाचा अंदाज यावरून काढला जातो...

हवामान मॉडेल म्हणजे काय? तुमच्या भागातल्या हवमानाचा अंदाज यावरून काढला जातो...

तुमचा हवमानाचा अंदाज कसा येतो माहितीये? जाणून घ्या सोप्या शब्दात..

तुमचा हवमानाचा अंदाज कसा येतो माहितीये? जाणून घ्या सोप्या शब्दात..

शेअर :

Join us
Join usNext

हवमानाचा अंदाज हा सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या जगण्यावर मोठा परिणाम करणारा. आपल्या भागात आज पाऊस येणार का? तापमान काय असणार? गारपीटीची शक्यता आहे का? याची उत्सूकता सर्वांनाच असते. तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता अशा हवामानाच्या अशा असंख्य शक्यतांची उत्तरे देणारा हवामान अंदाज हा अचूक येण्यासाठी जगभरातील हवमानतज्ञ, हवामान केंद्रे वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सचा अभ्सास करत असतात. 
 
हवेच्या दाबासह, आर्द्रता, पर्जन्य, वाऱ्याचा वेग अशी बरीच निरिक्षणे गोळा करून त्याच्या हजारो लाखो निरिक्षणांना व्यवस्थित समजून घेण्यासाठी हवामान मॉडेल्स काम करतात.त्यानंतरच आपल्या भागातलं हवामान आपल्याला हवामान अंदाजातून कळू शकतं.

हवामान मॉडेल्स म्हणजे काय?

हवमानाचा अंदाज हे खरेतर गणित आणि विज्ञानाचाच एक भाग आहे. वेगवेगळ्या भागातील गोळा केलेल्या मोठ्या सांख्यिकी माहितीची समीकरणे प्रचंड गुंतागुंतीची असतात. ढगांची बदलती दिशा, वाऱ्यांचे प्रवाह, पर्यावरणीय हलचाली याची आकडेवारी असल्यानं ती हजारो लाखो व्हेरिएबलमध्ये असते. विशेष: ही  माहिती सतत बदलत असते. त्यामुळे सगळी माहिती संगणकाशिवाय चालवणे अशक्य आहे. या माहितीच्या आधारे काढला गेलेला अंदाज म्हणजे हवामानाचा अंदाज. ज्या संगणकावर या माहितीचे प्रोगॅमिंग होते त्याला हवामान मॉडेल म्हणतात.

का करतात हवामान मॉडेलचा वापर?

वातावरणाची गणितीय समिकरणे म्हणजे हवामान मॉडेल. जगभरातील हवामान शास्त्रज्ञ हवामानाच्या अंदाजासाठी अनेक भिन्न प्रकारची हवामान मॉडल वापरतात. पण हवमान अंदाजात अनेक मॉडेलचा वापर का केला जातो?

हवमानशास्त्रज्ञ प्रत्येक हवामान अंदाजासाठी प्रकारासाठी भिन्न निवडी करते. अल्प मुदतीचा अंदाज देणारा शास्त्रज्ञ मेसोस्केल मॉडेल वापरेल तर दीर्घ श्रेणीच्या अंदाजासाठी नॉन मेसोस्केल मोडेल वापरेल.एखाद्या विशिष्ट प्रदेशात घडणारी हवामानाची घटना ही सर्वसामान्य वातावरणीय घटनांहून वेगळी असते. ती एकाच मापदंडावर तपासणे त्रासदायक ठरू शकते. 

उदा. सध्या विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाण्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे.
दोन भागात घडणाऱ्या हवमानाच्या घटना विरोधी आहेत. दोन्ही भागातील हवामानाची प्रादेशिक स्थितीचा एक अंदाज, एकत्रित सारांश, त्या विशिष्ट गावातला हवमान अंदाज अशा वेगवेगळ्या अंदाजांसाठी वेगवेगळी मॉडेल वापरली जातात. 

हवामान मॉडेल कसे काम करते?

पृथ्वीच्या वातावरणावर सुमारे ६० मैल उंच हवेचा थर आहे, ज्यामध्ये जटिल रासायनीक, द्रवांमुळे हवेचा झोत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत हलत असतो. हवामान मॉडेल या हवेच्या प्रवाहांची गणना करते. भौतीकशास्त्र आणि गणितीय नियमांचा वापर करून ही माहिती अशा पद्धतीने मांडली जाते ज्यावरून हवामानाचा निष्कर्ष काढता येईल.

कोणतेही हवामान मॉडेलचे तीन अविभाज्य भाग आहेत. हवामान विदा, संगणकीय पाठबळ आणि गणितीय समिकरण ज्यांच्यामधील परस्पर संवादाचा निष्कर्ष म्हणजे हवामान अंदाज. अचूक अंदाज बांधण्यसाठी तयार करण्यात आलेल्या मॉडेलमुळेच आपल्याला हवामानाचा अंदाज मिळू शकतो.

हेही वाचा- 

हवमानाचा अंदाज कसा वर्तवला जातो? हवामान विभाग वापरते या पद्धती..

Weather Station : घरबसल्या करा फळबागांचे खते, पाणी, कीडरोग अन् फवारणीचे नियोजन!

Web Title: What is a weather model? The weather forecast for your area is derived from…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.