Weather : यंदा देशभरात कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला असून यासोबत एल निनोचाही परिणाम यंदाच्या मान्सूनवर होणार आहे. कृषी क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होणार असून यंदा खरिपातील लागवडीखालील क्षेत्रामध्ये आणि उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये.
दरम्यान, यंदा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील तापमान जास्त असल्यामुळे जगभरात एल निनोची स्थिती तयार झाली आहे. या हवामानातील बदलाचा भारतीय मान्सूनवर परिणाम होणार असून यामुळेच यंदा पाऊस कमी पडणार आहे. मान्सूनच्या चारही महिन्यात एल निनोचा प्रभाव असून जूनपासून सप्टेबरपर्यंत हा प्रभाव वाढत जाईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
एल निनोच्या प्रभावामुळे देशभरातील जवळपास सर्वच भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असून यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
विविध उपाययोजना
शेतकऱ्यांनी खरिप हंगामात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करणे, उन्हाळ्यातच पाणी साठवणूक करण्यासाठी भूजल पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग असे उपाय करावेत अशा सूचना तज्ज्ञांकडून करण्यात आल्या आहेत. यासोबतच मान्सून दाखल होताच शेतकरी पेरण्यांसाठी आणि लागवडीसाठी घाई करतात, पण यंदा पेरण्यांची घाई न करता योग्य प्रमाणात ओलावा आणि पुढील पावसाचे प्रमाण बघूनच पेरणी करावी अशा सूचनाही हवामान विभागाने दिल्या आहेत.
Web Summary : El Nino is expected to cause lower rainfall nationwide. Farmers are advised to avoid hasty sowing, choosing less water-intensive crops and implementing water conservation methods due to anticipated impacts on Kharif crops and production.
Web Summary : एल नीनो के कारण देशभर में कम बारिश की संभावना है। किसानों को सलाह दी जाती है कि वे जल्दबाजी में बुवाई से बचें, कम पानी वाली फसलें चुनें और खरीफ फसलों और उत्पादन पर प्रत्याशित प्रभावों के कारण जल संरक्षण विधियों को लागू करें।