Join us

मुळा, भंडारदरा धरणातून जायकवाडीत सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 8:48 AM

पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणात ५७.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. या धरणात ६५ टक्यापेक्षा कमी पाणीसाठा असल्यास समन्यायी पाणी वाटप निर्णयाची अंमलबजावणी होते. यंदा जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरातून तीन, तर मुळा धरणातून दोन टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात येणार आहे. तसा आदेश जलसंपदा विभागाचे कार्यकारी सांचालक सं. रा. तिरमनवार यांनी सोमवारी काढला. पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्यासाठीची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, नदीपात्रातील अडथळे दूर झाल्यानंतर पाणी सोडण्यात येणार आहे.

पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणात ५७.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. या धरणात ६५ टक्यापेक्षा कमी पाणीसाठा असल्यास समन्यायी पाणी वाटप निर्णयाची अंमलबजावणी होते. यंदा जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. तसा आदेश जलसंपदा विभागाकडून जारी करण्यात आला आहे. हा आदेश सोमवारी सायंकाळी जलसंपदा विभागास प्राप्त झाला.

या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, मुळा व प्रवरा नदीतील पाचेगावपर्यंतचे अडथळे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. धरणातील सोडलेल्या पाण्याला अडथळा निर्माण होऊ नये, याची काळजी पाटबंधारे विभागाकडून घेण्यात येत आहे. मुळा धरणात सध्या २३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे. यातील दोन टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात येणार आहे. हे पाणी मुळा नदीतून सोडण्यात येणार असून, या मार्गावरील अडथळे दूर केले जाणार आहेत.

मुळा धरण ते प्रवरा संगमपर्यंतचा नदीपात्र परिसरातील विजपुवठा खंडित करण्यात येणार आहे. याशिवाय या मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.

धरणासह प्रवाहाचे व्हिडीओ चित्रीकरणमुळा धरणातून पाणी सोडतेवेळी तसेच मुळा व भंडारदरा धरण ते प्रवरासंगमपर्यंतच्या प्रवाहाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसा अहवाल जलसंपदा विभागास सादर करण्याचा आदेश पाटबंधारे विभागाला देण्यात आला आहे.

५२ किमीचा प्रवासमुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी ५२ किमीचे अंतर पार करून जायकवाडी धरणात जाणार आहे. या मार्गावरील सर्व अडथळे दूर करण्यात येणार असून, विना अडथळा पाणी जायकवाडीत सोडण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली.

टॅग्स :धरणपाणीशेतकरीपोलिसपैठणशेती