राज्यात तापमानाचा पारा तीव्र होत असताना बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी धरण साठा वेगाने कमी होत असून नाशिकच्या लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये आता 37.54% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 15.48 टक्क्यांनी जलसाठा कमी आहे.
नाशिकच्या सर्वाधिक क्षमता असणाऱ्या गिरणा धरणात केवळ 31.9% पाणी शिल्लक असून 162.75 दलघमी म्हणजेच 5.74 टीएमसी पाणी शिल्लक आहे. तर गंगापूर धरणात 2.5 टीएमसी पाणी शिल्लक असून दारणा 24.55% कडवा 20.80% तर मुकणे 34.40% भरले आहे.
नाशिक मधील एकूण 22 धरणांमध्ये आता सरासरी 38. 29% पाणी शिल्लक असून आज दिनांक 4 एप्रिल रोजी १४२८.५२ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा कमी पाऊस पडल्याने धरणे भरली नाहीत. त्यामुळे नागरिकांना तापमानासह पाणीटंचाईचेही चटके जाणवत आहेत.
जाणून घ्या कोणत्या धरणात किती पाणी?
घाम धरण 18.94%, भावली 13.2%, चकणापूर 12.92%, करंजवण 20.73%, मुकणे 34.40%, ओझरखेड 17.47%, पालखेड 55%, वैतरणा 59.81%
मराठवाड्याला दिलासा; समन्यायी पाणी वाटप धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
समन्यायी पाणी वाटप धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा अस्तित्वात आणून शासनाने आणलेल्या गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने या संबंधीच्या सर्व याचिका खारीज करून शिक्कामोर्तब केले आहे.