Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुढील तीन दिवस किमान तापमान आणखी घसरणार; राज्यात कुठे किती तापमान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 09:36 IST

maharashtra weather update मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी पडली असून, अनेक शहरांमध्ये पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी पडली असून, अनेक शहरांमध्ये पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे. पुढील तीन दिवस किमान तापमान आणखी घसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

दरम्यान, मुंबईत १६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, पुढील तीन दिवस राज्यभरात गारठा कायम राहील.

थंडगार वाऱ्यांमुळे हुडहुडीहवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले, उत्तर भारतातून दक्षिणेकडे गार वारे वाहत आहे. या बोचऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमान घसरले आहे. गुरुवारी किमान तापमान आणखी घसरेल.

राज्यातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्येअहिल्यानगर - ७.५छ. संभाजीनगर - १०.८बीड - ९डहाणू - १६.१जळगाव - ८कोल्हापूर - १४.६महाबळेश्वर - ११.६मालेगाव - ९.४मुंबई - १६.७नांदेड - १०.६नंदुरबार - १२.७नाशिक - ८.१धाराशिव - १२.६पालघर - १२.८परभणी - १०.५सांगली - १३सातारा - ११.६ठाणे - २१

अधिक वाचा: ऊस तोडणी व ओढणीने शेतकऱ्याला दिला झटका; प्रतिटनाला बसतोय शंभर रुपयांचा फटका

टॅग्स :हवामान अंदाजतापमानमहाराष्ट्रमुंबई